Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेसनेही घेरले ‘नॅशनल टास्क फोर्स’च्या मुद्द्यावर; पहा काय टोला हाणलाय मोदी सरकारला

मुंबई : देशभरात करोना विषाणूची दुसरी लाट अनेकांना धडकी भरवणारी ठरली आहे. दुर्दैवाने रुग्णसंख्या जोमात असतानाच ऑक्सिजनची आणि औषधांची पळवापळवी व काळाबाजार यालाही उत आला आहे. केंद्रीय आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारच्या यंत्रणेला हे सुरळीत करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अखेर आता यात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालताना ऑक्सिजन आणि औषधांच्या सप्लाय मॅकॅनिझमसाठी नॅशनल टास्क फोर्स तयार केला आहे. त्यावरून आता विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

काँग्रेस पक्षाने यावर एक इमेज शेअर करून ट्विटरवर म्हटले आहे की, वारंवार खडे बोल सुनावूनही मोदी सरकारचा कारभार किंचीतही सुधारला नाही. शेवटी ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयला टास्क फोर्स नेमावा लागला. सरकार असूनही जर न्यायालयाला कारभार हाती घ्यावा लागत असेल तर या निष्क्रिय भाजप सरकारचा उपयोग तरी काय?

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “वारंवार खडे बोल सुनावूनही मोदी सरकारचा कारभार किंचीतही सुधारला नाही. शेवटी ऑक्सीजन व औषधांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयला टास्क फोर्स नेमावा लागला. सरकार असूनही जर न्यायालयाला कारभार हाती घ्यावा लागत असेल तर या निष्क्रिय भाजप सरकारचा उपयोग तरी काय? https://t.co/utxxjTll91” / Twitter

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याच्या महाविकास आघाडीमधील मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, ‘ऑक्सिजन आणि अन्य औषधांचं देशात न्याय्य वितरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून १२ तज्ञ डॉक्टरांच्या समितिची नियुक्ती. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा हा पुरावा समजावा का? माझा जीव वाचवणारे डॉ. राहुल पंडित सुद्धा या समितीत आहेत.’ एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा केंद्र-राज्य आणि राष्ट्रवादी-भाजप यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आता देशातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी लक्ष देण्याची नागरिकांनी आग्रह धरणे आवश्यक बनलेले आहे.

Advertisement

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अहवालानुसार या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन शासकीय स्तरावरील अधिकारी असतील. अचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशभरात औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. ते पाहता ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याबरोबरच सरकारने परदेशातून ऑक्सिजन आयात केली. असे असूनही बऱ्याच भागात आणि राज्यात ही समस्या दूर झाली नाही. आता या समस्येचा सामना करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply