Take a fresh look at your lifestyle.

‘नॅशनल टास्क फोर्स’च्या नियुक्तीवर मंत्री आव्हाडांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया..!

मुंबई : देशभरात दुसरी लाट जोमात असतानाच ऑक्सिजनची आणि औषधांची पळवापळवी यासह काळाबाजार जोमात आहे. मागील दीड वर्षातही याचे योग्य नियोजन केंद्रीय आरोग्य यंत्रणेला करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अखेर आता यात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालताना ऑक्सिजन आणि औषधांच्या सप्लाय मॅकॅनिझमसाठी नॅशनल टास्क फोर्स तयार केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याच्या महाविकास आघाडीमधील मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “ऑक्सिजन आणि औषधांच्या सप्लाय मॅकॅनिझम तयार करण्यासाठी नॅशनल टास्क फोर्स तयार #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/s0PZO8gDaw” / Twitter

Advertisement

आव्हाड यांनी म्हटले आहे की, ‘ऑक्सिजन आणि अन्य औषधांचं देशात न्याय्य वितरण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून १२ तज्ञ डॉक्टरांच्या समितिची नियुक्ती. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा हा पुरावा समजावा का? माझा जीव वाचवणारे डॉ. राहुल पंडित सुद्धा या समितीत आहेत.’ एकूणच यानिमित्ताने पुन्हा एकदा केंद्र-राज्य आणि राष्ट्रवादी-भाजप यांच्यात कलगीतुरा रंगणार आहे. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आता देशातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी लक्ष देण्याची नागरिकांनी आग्रह धरणे आवश्यक बनलेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “महत्वाचे आहे की हे.. *(दुर्दैवाने का होईना)” / Twitter

Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने देशात औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याबाबत एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स औषधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवणार आहे. त्याचबरोबर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक सूत्र तयार करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अहवालानुसार या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन शासकीय स्तरावरील अधिकारी असतील.

Advertisement

Krushirang on Twitter: “चाचणीत असे आढळले आहे की यामुळे रुग्णाच्या ऑक्सिजनची पातळीही चांगली सुधारते. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/CRr5xwVdtJ” / Twitter

Advertisement

अचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशभरात औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. ते पाहता ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याबरोबरच सरकारने परदेशातून ऑक्सिजन आयात केली. असे असूनही बऱ्याच भागात आणि राज्यात ही समस्या दूर झाली नाही. आता या समस्येचा सामना करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply