Take a fresh look at your lifestyle.

एचआर सिटी स्कॅनला ‘हे’ आहेत पर्याय; वाचा जेनएक्सपर्टचे काय फायदे आहेत ते

पुणे : करोना रॅपिड अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीआर आणि एचआरसिटी स्कॅन करण्याचा हा काळ आहे. फुफ्फुसातील इन्फेक्शन शोधण्यासाठी एचआरसिटी स्कॅन करण्याचेही अनेक दुष्परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे. कारण, आपल्याला झालेले इन्फेक्शन शोधण्यासाठी इतरही काही पर्याय आहेतच की.

Advertisement

लोक कोरोनापासून इतके घाबरले आहेत की जेव्हा काही लक्षणे आढळतात तेव्हा ते थेट सीटी स्कॅनसाठी धावतात. यामुळे सध्या सीटी स्कॅन सेंटरवर प्रचंड गर्दी आहे. त्यातच एम्स-दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हटले आहे की, सीटी स्कॅन केंद्रांवर गर्दी करण्याची आवश्यकता नाही. सीटी स्कॅन वाटते तितके चांगले नाही. सीटी स्कॅन 250-300 एक्स-किरणांइतकी रेडिएशन उत्सर्जित करतो. प्रत्येक रुग्णाला ते करण्याची आवश्यकता नाही.

Advertisement

Krushirang on Twitter: “रॅपिड अँटिजेन टेस्ट, आरटीपीसीआर आणि लगोलग एचआरसिटी स्कॅन करण्याची प्रोसिजर सामान्य झालेली आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/LaIM1kOc9v” / Twitter

Advertisement

तथापि, भारतीय रेडिओलॉजी & इमेजिंग असोसिएशनने (आयआरआयए) यांनी गुलेरिया यांचे हे म्हणणे फेटाळले. असोसिएशनचे म्हणणे आहे की, सीटी स्कॅनमध्ये शक्य तितके कमी रेडिएशन वापरले जाते. यामुळे कर्करोग किंवा इतर आजार होण्याचा धोका खूप कमी आहे. तर, हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये छातीच्या एक्स-किरणांपेक्षा 70 पट जास्त रेडिएशन असते. दीर्घ कालावधीसाठी आणि जास्तवेळा सीटी स्कॅन करणे कर्करोग व ब्रॉन्कोशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे पुढील पर्याय नक्कीच वाचा :

Advertisement

बरेच रुग्ण चुकीचा सल्ला घेतात आणि दुसर्‍याच दिवशी सीटी स्कॅनसाठी जातात. यामुळे, सीटी स्कॅन करण्यापूर्वी एक्स-रे हा एक चांगला पर्याय आहे. ते सुरक्षित आणि स्वस्त आहे. तसेच त्याचा रिपोर्टही पटकन मिळतो. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीटी स्कॅन केले पाहिजे. आजकाल बरेच लोक वैद्यकीय सल्ल्याशिवाय सीटी स्कॅनसाठी पोहोचत आहेत आणि सीटी स्कॅन केंद्रांवर अनावश्यक दबाव आणत आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “अनेकदा लसीकरण केंद्रावर व्हीआयपी संस्कृती जोपासली जात आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #Ahmednagar #अहमदनगर https://t.co/HyIbb5vyak” / Twitter

Advertisement

संसर्गाची तपासणी करण्याचा पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन टेस्ट ही चाचणी देखील केली जाऊ शकते. तसेच जेनेक्सपर्ट (Genexpert) चाचणी ही सर्वोत्कृष्ट आहे. पूर्वी टीबी शोधण्यासाठी याचा वापर केला जात असे. आता कोरोनाच्या तपासणीतदेखील याचा काही ठिकाणी उपयोग होत आहे. जेनिएक्सपर्टमध्ये रिपोर्ट फ़क़्त 20-40 मिनिटांत उपलब्ध होतो. मात्र, ही चाचणी फक्त मोठ्या रुग्णालयात उपलब्ध आहे. याबाबत जनजागृतीही वाढत आहे. जेनेक्सपर्ट चाचणीमध्ये 100% सेंसिटिविटी रेट आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply