Take a fresh look at your lifestyle.

चांगल्या मॉन्सूनमुळे ‘त्या’ सेक्टरमध्ये पडणार पैशांचा पाऊस; पहा कोणते शेअर देतील दणक्यात रिटर्न

पुणे : यंदा सरासरीच्या तुलनेत मॉन्सूनचा (monsoon) पाऊस दमदार म्हणजे ९८ टक्के होण्याची शक्यता आहे. चांगला पाऊस म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन चांगले मिळण्याची हमी. मात्र, त्याचवेळी शेअर बाजारातही याचे सकारत्मक पडसाद पडण्याची चिन्हे आहेत. यातूनच काही सेक्टरमध्ये दणक्यात रिटर्न मिळून अनेक शेअर पैशांचा पाऊसही पडू शकतील असा अंदाज आहे. मात्र, हे सगळे पाऊस कसा, किती अन कोणत्या टप्प्यात पडतो यावर ठरणार आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/j6QQTZenPr” / Twitter

Advertisement

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दीर्घकालीन कालावधीत सरासरी 96-104 टक्के पाऊस पडू शकेल. आयएमडीच्या मते, एल निनोची परिस्थिती तटस्थ राहिली आहे त्यामुळे यावर्षी मान्सूनची सरासरी 98 टक्के असू शकते. हवामान माहिती एजन्सी स्कायमेटच्या मते यंदा एलपीएच्या 103 टक्के भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने दोन्ही एजन्सीने पाऊस दमदार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Advertisement

केडिया कमोडिटीचे सल्लागार अजय केडिया यांचे म्हणणे आहे की, मान्सून सामान्य राहिला तर बियाणे (seed), खते (fertilizers), शेती अवजारे (agriculture equipments), पंप (spraying pump) इत्यादींची मागणी शेतीच्या कामांमुळे वाढते. ग्रामीण उत्पन्न वाढल्यास क्रयशक्ती वाढते. यामुळे एफएमसीजी, दुचाकी आणि ग्राहक वस्तूंची मागणी वाढते. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या पावसाळ्यामुळे दुचाकी वाहन (vehicle), वाहन, ग्रामीण वित्तपुरवठा (rural finance and bank loans), कृषीरसायन (agro chemical) आणि निवडक एफएमसीजी (FMCG) कंपन्यांना याचा फायदा होईल.

Advertisement

Krushirang on Twitter: “#निवडणूक म्हटले की बाता #लोकशाही च्या आणि कृती आर्थिक हुकुमशाहीची. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #election #politics https://t.co/fT690aDj8n” / Twitter

Advertisement

भारतात एकूण शेतीमध्ये 60 टक्क्यांहून अधिक जमीन अशी आहे, जेथे योग्य सिंचन सुविधा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत त्या भागातील शेतकरी शेतीसाठी पावसावर अवलंबून असतात. या हंगामात भात, मका, डाळी, कापूस आणि ऊस ही पिके पावसाळ्यावर अवलंबून असतात. चांगल्या पावसामुळे उत्पन्न वाढल्याने कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या किंमती नियंत्रणात राहतील. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. अशावेळी शेतीमधील समान्य परिस्थिती अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योग्य कार्य करणार आहे.

Advertisement

अशावेळी कोरोमंडल इंटरनॅशनल, जीएनएफसी, आरसीएफ, हिरो मोटर, टीव्हीएस, बजाज, महिंद्रा अंड महिंद्रा, डाबर इंडिया, आयटीसी यासह बियाणे, खते, शेती अवजारे आणि अन्नधान्य क्षेत्राशी निगडीत कंपन्यांना मोठा फायदा होईल. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक असलेल्या मंडळींना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply