Take a fresh look at your lifestyle.

आणखी नवे संकट : करोनातून बरे झालेल्या रुग्णांना होतोय ‘हाही’ नेत्रविकार; पहा काय आहेत लक्षणे

मुंबई : कोरोना विषाणूचे रुग्ण बरे झाल्यावर त्यांना इतरही काही आजारांचा सामना करावा लागत आहे. काही आजार गंभीर असतात, तर काही साधे. मात्र, यामुळे हा विषाणू आणखी धोकादायक ठरत आहे. आताही अनेक रुग्णांना काळी बुरशीच्या आजारांशी सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये अशी बरीच प्रकरणे आढळली आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “#निवडणूक म्हटले की बाता #लोकशाही च्या आणि कृती आर्थिक हुकुमशाहीची. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #election #politics https://t.co/fT690aDj8n” / Twitter

Advertisement

गुजरातमधील सूरतमध्ये म्यूकोरमायकोसिस (ब्लॅक फंगस) पासून आठ रुग्णांना त्यांचा डोळा प्रकाश गमावावा लागला आहे. सुरात शहरात 40 रुग्णांना याची लक्षणे दिसली. त्यापैकी आठ रुग्णांना डोळ्यांतून पाहण्याची क्षमता गमवावी लागली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे ही, या आजाराचा संसर्ग कोरोनामुळे पसरतो आणि त्यावर उपचारही करता येतो. परंतु, उपचारास उशीर झाल्यास किंवा योग्य वेळेला उपचार मिळाला नाही तर त्याचा परिणाम रुग्णाच्या मृत्यूवर होतो.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/j6QQTZenPr” / Twitter

Advertisement

सुरत व्यतिरिक्त मुंबईतील एका 29 वर्षीय व्यक्तीलाही म्यूकोरमायसिसचे निदान झाले आहे. कोरोनापासून बरे झाल्यानंतर सुहास नावाच्या व्यक्तीला काळ्या बुरशीची लक्षणे दिसू लागली आणि नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. हा संसर्ग मेंदूत पोहोचू नये म्हणून डॉक्टरांनी सुहासचा वरचा जबडा काढून टाकला आहे. सध्या मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये म्यूकोरामायसिसचे 18 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. महाराष्ट्रात काळ्या बुरशीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच रुग्णांचा वरचा जबडा काढावा लागला आणि एक डोळाही गेला आहे.

Advertisement

परळ येथील केईएम रुग्णालयात 25 हून अधिक रुग्णांवर याबाबत उपचार सुरू आहेत. याचा संसर्ग नाकापासून सुरू होतो. नंतर जबड्यातून मेंदूपर्यंत जातो. एकदा हा संसर्ग मेंदूत पोहोचला की रुग्णाची जगण्याची शक्यता खूप कमी होते. अमेरिकेच्या सीडीसीनुसार म्यूकोरामायकोसिस किंवा ब्लॅक फंगस हा एक दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग आहे. परंतु हे एक गंभीर संक्रमण आहे. जे बुरशी किंवा बुरशीच्या गटामुळे होते. याचा परिणाम सायनस किंवा फुफ्फुसांवर होतो.

Advertisement

कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानंतर दोन-तीन दिवसानंतर म्यूकोमायकोसिस किंवा काळ्या बुरशीची लक्षणे दिसतात. संसर्ग प्रथम सायनसमध्ये दिसून येतो आणि नंतर डोळ्याकडे जातो. त्याच वेळी ही बुरशी पुढील 24 तासांत मेंदूपर्यंत जाऊ शकते. तज्ञांचे म्हणणे आहे की, कमकुवत प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांना याचा जास्त धोका असतो. मधुमेह असलेल्या रुग्णांनीही काळजी घ्यावी. म्यूकोमायकोसिसमध्ये तीव्र डोकेदुखी आणि डोळ्यात लालसरपणा ही दोन सामान्य लक्षणे आहेत. असे असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply