Take a fresh look at your lifestyle.

अनिल अंबानी यांची कंपनी तोट्यातून आली नफ्यात, पहा किती नफा झालाय..?

मुंबई : कोरोना काळात अनेक बिझनेस डबघाईला आले असले, तरी दुसरीकडे रिलायन्सचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्या कंपनीला मोठा नफा झाला आहे. कोरोना काळात ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीने 72 कोटींचा नफा कमावला आहे. ‘रिलायन्स पॉवर’ (Reliance पॉवर) ही कंपनी पूर्वी ‘रिलायन्स एनर्जी’ या नावाने ओळखली जात होती. याच कंपनीला कोरोना काळात चांगला नफा मिळाला आहे.

Advertisement

रिलायन्स पॉवरने मार्च-2021च्या तिमाहीत 72.56 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, तर मार्च 2020मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 4,206.38 कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. म्हणजेच कंपनीला 4,206 कोटींचा तोटा सहन करावा लागल्यानंतरही 72.56 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे अनिल अंबानी आणि रिलायन्स इन्फ्राचे सीईओ राजा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, ‘रिलायन्स पॉवर’च्या नफ्यासोबतच उत्पन्नातही वाढ झाली आहे. या वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न हे 1,691.19 कोटी रुपये होते, तर एका वर्षापूर्वी याच काळात 1,902.03 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला एकत्रित निव्वळ नफा 228.63 कोटी रुपये इतका होता, तर 2019-20 मध्ये हा नफा 4,076.59 कोटी इतका होता. 2020-21 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 8,388.60 कोटी रुपये इतके होते, तर गेल्या आर्थिक वर्षात 8,202.41 कोटी रुपये इतके होते.

Advertisement

दरम्यान, अनिल अंबानी यांचा मुलगा आणि रिलायन्स इन्फ्रा (RInfra) आणि रिलायन्स कॅपिटलचे (Reliance Capital) डायरेक्टर अनमोल अंबानी यांनी लॉकडाऊनवरुन सवाल केले होते. कलाकार त्यांचे चित्रपट शूट करू शकतात, क्रिकेटपटू रात्री उशिरापर्यंत खेळू शकतात. नेतेमंडळी गर्दीसह मेळावे घेऊ शकतात; पण एखादा बिझनेस किंवा काम हे अत्यावश्यक सेवेत येत नाही, असे ट्वीट त्यांनी केले होते.

Advertisement

मालमत्ता विकण्याचा निर्णय
वाढत्या कर्जामुळे अनिल अंबानी यांना ‘रिलायन्स इन्फ्रा’चे मुंबई हेड ऑफिस ‘येस बँके’ला विकावे लागले होते. हा व्यवहार 1200 कोटी रुपयांमध्ये झाला होता. ‘रिलायन्स इन्फ्रा’वरील थकबाकी वसूल करण्यासाठी आर्थिक कारवाई केली गेली होती. त्यावेळी ‘रिलायन्स इन्फ्रा’ला वाढत्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला होता.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply