Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारचा निर्णय जातीयवादी भूमिकेचा; आंबेडकरांनी केली टीका

मुंबई : यापुढे आरक्षणानुसार नव्हे तर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने काढला आहे. रिक्त ठेवलेली ३३ टक्के आरक्षित रिक्त पदेही आता सेवाज्येष्ठतेनुसारच भरली जाणार असल्याचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने नवीन जीआरद्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या जातीयवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचे बळी देत आहे. एकूणच राज्य सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

Prakash Ambedkar on Twitter: “महाराष्ट्र शासनाने नवीन जीआरद्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या जातीयवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचे बळी देत आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks” / Twitter

Advertisement

उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवले होते. या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र यामुळे पदोन्नती रखडल्याने राज्य सरकारने आरक्षणाशिवाय सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पुन्हा २० एप्रिल २०२१ ला शासन निर्णय काढून पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून केवळ खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत शासन निर्णय जारी केला होता. आता त्यात बदल करून पुन्हा एकदा सर्व पदे आरक्षणाशिवाय भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement

Krushirang on Twitter: “यासह बियाणे, खते, शेती अवजारे आणि अन्नधान्य क्षेत्राशी निगडीत कंपन्यांना मोठा फायदा होईल. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #business https://t.co/xHn3DXHn6a” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply