Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘सुप्रीम’ने बनवला नॅशनल टास्क फोर्स; ऑक्सिजन-औषधांबाबत तयार होणार सप्लाय मॅकॅनिझम

दिल्ली : देशभरात दुसरी लाट आलेली असतानाही केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ठोस धोरण तयार करण्यात भारताला यश आलेले नाही. ऑक्सिजनची आणि औषधांची पळवापळवी आणि काळाबाजार जोमात आहे. दीड वर्षात याचे योग्य नियोजन न झाल्याने अखेर आता यात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातले आहे. त्यानुसार ऑक्सिजन आणि औषधांच्या सप्लाय मॅकॅनिझम तयार करण्यासाठी नॅशनल टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने देशात औषधे आणि ऑक्सिजन पुरवण्याबाबत एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स औषधांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक उपाययोजना सुचवणार आहे. त्याचबरोबर राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक वैज्ञानिक आणि व्यावहारिक सूत्र तयार करण्याची जबाबदारी या समितीवर आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अहवालानुसार या टास्क फोर्समध्ये 12 सदस्य आहेत. त्यापैकी 10 देशातील नामांकित डॉक्टर आणि दोन शासकीय स्तरावरील अधिकारी असतील.

Advertisement

(2) Krushirang on Twitter: “चाचणीत असे आढळले आहे की यामुळे रुग्णाच्या ऑक्सिजनची पातळीही चांगली सुधारते. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/CRr5xwVdtJ” / Twitter

Advertisement

अचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने देशभरात औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन कमी झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या. ते पाहता ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याबरोबरच सरकारने परदेशातून ऑक्सिजन आयात केली. असे असूनही बऱ्याच भागात आणि राज्यात ही समस्या दूर झाली नाही. आता या समस्येचा सामना करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यावर ठोस तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समितीमधील मेंबर असे :

Advertisement
  1. डॉ. भाबतोश बिस्वास, पूर्व वाइस चांसलर, वेस्ट बंगाल यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेस, कोलकाता
  2. डॉ. देवेंद्र सिंह राणा, चेयरपर्सन, बोर्ड ऑफ मैनेजमेंट, सर गंगाराम हॉस्पिटल, दिल्ली
  3. डॉ. देवी प्रसाद शेट्‌टी, चेयरपर्सन एंड एग्जीक्यूटिव डायरेक्टर, नारायणा हेल्थकेयर बेंगलुरु
  4. डॉ. गगनदीप कांग, प्रोफेसर, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडु
  5. डॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, क्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडु
  6. डॉ. नरेश त्रेहान, चेयरपर्सन एंड मैनेजिंग डायरेक्टर, मेदांता हॉस्पिटल एंड हार्ट इंस्टीट्यूट, गुड़गांव
  7. डॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केयर मेडिसिन एंड ICU, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई
  8. डॉ. सौमित्र रावत, चेयरमेन एंड हेड, डिपार्टमेंट ऑफ सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी एंड लिवर ट्रांसप्लांट, सर गंगाराम हॉस्पिटल दिल्ली
  9. डॉ. शिव कुमार सरीन, सीनियर प्रोफेसर, एंड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ हीपैटोलॉजी, डायरेक्टर, इंस्टीट्यूट ऑफ लिवर एंड बाइलियरी साइंस, दिल्ली
  10. डॉ. जरीर एफ उदवाडिया, कंसलटेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कैंडी हॉस्पिटल एंड पारसी जनरल हॉस्पिटल, मुंबई
  11. सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ एंड फैमिली वेलफेयर (पदेन सदस्य)
  12. कनवीनर ऑफ दी नेशनल टास्क फोर्स (जो सदस्य भी होगा) केंद्र के कैबिनेट सेक्रेटरी

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply