Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : भाजप खासदाराने लिहिले पत्र; पहा नेमकी काय चिंता व्यक्त केलीय त्यांनी

दिल्ली : एकीकडे महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच सगळे कसे आलबेल आहे असे चित्र सगळीकडून रंगवले जात आहे. तशीच परिस्थिती देशभरातील सर्वच राज्यांमध्ये आहे. उत्तरप्रदेश राज्यात तर आता करोना नियंत्रणात आल्यागत माध्यमांचे वार्तांकन चालू आहे. त्यालाच झटका देण्याचे कार्य भाजप खासदाराने केले आहे.

Advertisement

म्हणून गडकरी फॉर्म्युला आलाय ट्रेंडमध्ये; पहा का मिळत्येय ‘रोड बिल्डर’ना पसंती

Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात आरोग्य व्यवस्थेत अनागोंदी असून ती सुधारण्याचे आवाहन कानपूर येथील भाजप खासदारांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपले पत्र मुख्यमंत्री योगी यांना न लिहिता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना लिहिले आहे. कानपूरमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. तर योग्य उपचारांच्या अभावामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. यामुळे योगी सरकार बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेला सुधारण्यात व्यस्त आहे. दरम्यान, कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी दुसऱ्या लाटेत होणाऱ्या गोंधळाची चिंता करत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहिले आहे.

Advertisement

‘रेमडेसिविर’मुळे झालेत ‘हेही’ दुष्परिणाम; पहा कोणत्या नव्या लक्षणांनी रुग्ण झालेत हैराण

Advertisement

दुसर्‍या लाटेमुळे झालेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर खासदार पचौरी यांनी उपमुख्यमंत्री मौर्य यांना पत्र लिहून आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. पचौरी यांनी लिहिले आहे की, कोविड 19 च्या लाटेमुळे कानपूरमध्ये जास्त लोक मरत आहेत. त्यापैकी बहुतेक अशी प्रकरणे आहेत ज्यांना वेळेवर उपचार मिळालेले नाहीत. लोक रूग्णालयाच्या बाहेर किंवा त्यांच्या घरी रुग्णवाहिकांमध्ये मरण पावले आहेत. दरम्यान, तिसरी लाटही भारतात येऊ शकेल.  सध्याच्या दुसर्‍या लहरीपेक्षा ती अधिक प्राणघातक असू शकते, असा अंदाजही भारत आणि परदेशातील अनेक तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. त्यासाठी सरकारी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply