Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : लसीकरणाच्या ‘त्या’ मुद्द्यांकडे आमदार रोहित पवारांनी वेधले लक्ष..!

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. सध्या कोणीही, कुठेही लसीकरणासाठी जाऊ शकत असल्याने चारचाकी गाड्या असलेल्या किंवा ओळखीच्या मंडळींनी काही लसीकरण केंद्रांवर लांब जाऊन लसीकरण करण्याची पर्वणी साधली आहे. काही ठिकाणी तर व्हीआयपी संस्कृतीत लसीकरण केले जात आहे. त्यातील काही मुद्द्यांवर आमदार पवारांनी बोट ठेवले आहे.

Advertisement

त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग करून म्हटले आहे की, राज्यात नागरिकांना दुसऱ्या शहरात किंवा तालुक्याबाहेरही लस घेता येत असल्याने त्या शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होते आणि नियोजनाच्यादृष्टीनेही विस्कळीतपणा येतो. त्यामुळं स्वतःच्याच शहरात किंवा तालुक्यात लस घेता येईल, असा निर्णय घेतल्यास लसीकरणाचं नियोजन सोपं होईल. तसंच नियोजनात विस्कळितपणा येणार नाही. याशिवाय केंद्राकडून पाहिजे त्या प्रमाणात लसी मिळत नसल्याने लस देण्याबाबत काही प्राधान्यक्रम ठरवता येईल का आणि लसीकरण केंद्रंही वाढवता येतील का याकडं लक्ष देण्यात यावं, ही विनंती!

Advertisement

(1) Rohit Pawar on Twitter: “राज्यात नागरिकांना दुसऱ्या शहरात किंवा तालुक्याबाहेरही लस घेता येत असल्याने त्या शहरातील किंवा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होते आणि नियोजनाच्यादृष्टीनेही विस्कळीतपणा येतो. त्यामुळं स्वतःच्याच शहरात किंवा तालुक्यात लस घेता येईल, असा निर्णय घेतल्यास लसीकरणाचं नियोजन सोपं होईल.” / Twitter

Advertisement

तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण #RTPCR टेस्ट मोठ्या प्रमाणात करत असलो तरी त्याचा रिपोर्ट येण्यास वेळ लागत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणून कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी #antigentest आवश्यक आहे, मात्र टेस्ट किटचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने या टेस्ट करण्यास मर्यादा येत आहेत. पुरावठादाराने या टेस्ट किटचा पुरवठा वाढवला तर टेस्टचं प्रमाण वाढवता येईल आणि कोरोनाच्या संशयित रुग्णांना वेळीच वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार करता येतील. परिणामी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासही मदत होईल. याकडं लक्ष देण्यात यावं, ही विनंती!

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply