Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वाढलेय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण; पहा नेमका काय झालाय आरोग्यसेवेचा गोंधळ

पुणे : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात कडक नियमांची अंमलबजावणी करून करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सध्या करोनाचे अँटीजेन टेस्ट कीट कमी असल्याने रुग्णांच्या चाचण्या करताना अडचणी येत आहेत. परिणामी वेळीच निदान आणि पुचार मिळत नसल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढत आहे. याच महत्वाच्या मुद्द्यामुळे अनेक रुग्णांना नंतर रुग्णालयात उपचारावर मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Advertisement

हाच मुद्दा महत्वाचा समजून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मागणी केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण #RTPCR टेस्ट मोठ्या प्रमाणात करत असलो तरी त्याचा रिपोर्ट येण्यास वेळ लागत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणून कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी #antigentest आवश्यक आहे, मात्र टेस्ट किटचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने या टेस्ट करण्यास मर्यादा येत आहेत. पुरावठादाराने या टेस्ट किटचा पुरवठा वाढवला तर टेस्टचं प्रमाण वाढवता येईल आणि कोरोनाच्या संशयित रुग्णांना वेळीच वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार करता येतील. परिणामी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासही मदत होईल. याकडं लक्ष देण्यात यावं, ही विनंती!

Advertisement

(1) Rohit Pawar on Twitter: “आपण #RTPCR टेस्ट मोठ्या प्रमाणात करत असलो तरी त्याचा रिपोर्ट येण्यास वेळ लागत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणून कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी #antigentest आवश्यक आहे, मात्र टेस्ट किटचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने या टेस्ट करण्यास मर्यादा येत आहेत.” / Twitter

Advertisement

एकूणच देशभरातील इतर राज्यांचा फॉर्म्युला आहे की, चाचण्या कमी करून रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे दाखवणे. तसाच प्रकार आता राज्यातही काही ठिकाणी सुरू झाला नाही ना, अशीही शंका येण्यास वाव आहे. मात्र, राज्यभरात आरोग्य विभागाने अशा अँटीजेन टेस्ट कीट तातडीने उपलब्ध करून दिल्यास हजारो लोकांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Advertisement

Leave a Reply