Take a fresh look at your lifestyle.

मुलांच्या आरोग्यावर राज्य सरकार गंभीर; पहा नेमक्या काय सूचना केल्यात आरोग्यमंत्र्यांनी

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट जोरात असून यामध्ये लहान मुलांमध्ये दिसत असलेली लक्षणे आणि त्यांची वाढती रुग्णसंख्या सगळ्यांच्या काळजाचा ठेका चुकवणारी आहे. त्याचवेळी संभाव्य तिसत्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.

Advertisement

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. त्यांच्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:

Advertisement
  • राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
  • विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल.
  • रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटीलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला.
  • महाराष्ट्र लसीकरणात देशात आघाडीवर आहे.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी पुरेशी लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग आला नाहीये. या वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
  • महाराष्ट्रात रशियातील स्पुटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्याशी या लसीच्या दराबाबत बोलणी सुरू आहे.
  • जागतिक निविदेच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 लाख रेमडेसीवीर इंजेक्शन आयातीसाठी डीसीजीआयच्या मान्यतेने खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत.

(1) Rohit Pawar on Twitter: “आपण #RTPCR टेस्ट मोठ्या प्रमाणात करत असलो तरी त्याचा रिपोर्ट येण्यास वेळ लागत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण वाढतंय. म्हणून कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी #antigentest आवश्यक आहे, मात्र टेस्ट किटचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने या टेस्ट करण्यास मर्यादा येत आहेत.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply