Take a fresh look at your lifestyle.

स्टालिन यांच्या मंत्रिमंडळात ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ही; पहा नेमके कसे आहेत मंत्रीगण

चेन्नई : तामिळनाडू या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या राज्यावर द्रविड मुन्नेत्र कळगम या पक्षाचे अध्यक्ष एमके स्टालिन यांना मतदारांनी भरघोस मतांनी संधी दिली आहे. आज मुख्यमंत्री पदावर स्टालिन यांच्यासह 34 मंत्र्यांनी शपथ घेतली. स्टालिन यांनी मंत्रिमंडळात ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ यांनाही संधी दिल्याने हा मुद्दा ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मिळतो ‘एवढा’ पगार; वाचा, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा पगार

Advertisement

इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळवून देताना राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा त्याग अवघा देश जाणून आहे. तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशभरात इंग्रजी सत्तेच्या विरोधात आवाज उठवून त्यावेळी जहाल आणि मावळ गटाच्या काँग्रेस नेते-कार्यकर्ते आणि डाव्या विचारांच्या क्रांतिकारी नेत्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सध्या अफवांच्या बाजारात हेच सगळे स्वातंत्रसैनिक अनेकांनी बदनाम केले आहेत. मात्र, स्टालिन यांच्या मंत्रीगणात गांधी आणि नेहरू अशी दोन नावे आल्याने हा मुद्दा ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

(1) ANI on Twitter: “Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu. He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit https://t.co/e8IZT1aNFz” / Twitter

Advertisement

विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तामिळनाडूमध्ये सत्ता बदलली आहे. द्रविड मुनेत्र कळगम (द्रमुक) यांनी एकट्याने 133 जागा मिळवून राज्यात सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर एमके स्टालिन यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. स्टालिन यांच्या नवीन 34 सदस्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात ‘स्टालिन’ सोबत ‘गांधी’ आणि ‘नेहरू’ असतील.

Advertisement

डीएमके चीफ स्टालिन यांच्या नेतृत्वात तामिळनाडूच्या राजभवनात शुक्रवारी शपथविधी झाला. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे. स्टालिन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. यामध्ये एन. नेहरू यांना नागरी प्रशासन मंत्री म्हणून नेमण्यात आले, तर आर. गांधींचे नाव हातमाग व वस्त्रोद्योग, खादी व ग्रामीण उद्योग मंडळ म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे.

Advertisement

Assembly Result 2021 : तामिळनाडूमध्ये मतदारांनी दिली DMK च्या स्टॅलीन यांना संधी; पहा रात्री 9.30 ची आकडेवारी

Advertisement

के. एन. नेहरू हे द्रमुकचे जुने व कट्टर नेते आहेत. 1989 मध्ये प्रथमच निवडणूक जिंकलेल्या नेहरूंनी तिरुची पश्चिमेकडील जागा सतत लढविली आहे जिंकली आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर ठेवले. तर, आर. गांधी हे राणीपेट सीटवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1996 पासून ते विधानसभेत आहेत. त्याच बरोबर, तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार्‍या स्टालिन यांचे पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन आहे. त्यांचे नाव सोव्हिएत युनियनचे प्रसिद्ध नेते जोसेफ स्टालिन यांच्यावर ठेवले गेले. दिवंगत माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांना घोषित केले. त्यांच्या निधनानंतर स्टालिन 28 ऑगस्ट 2018 रोजी द्रमुकचे अध्यक्ष झाले आणि आता मुख्यंमत्री झालेले आहेत.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply