Take a fresh look at your lifestyle.

एकाच क्लिकवर मिळणार पिक कर्ज; पहा नेमकी कशी आहे प्रोसिजर

अहमदनगर : सध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग खूप भयंकर आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात लॉकडाऊन लागू आहे. तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कडक निर्बंध आहेत. अशावेळी खरीप हंगामात नागरिकांना पिक कर्ज (Crop Loan) मिळण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच शेतकरी पिक कर्जासाठी ऑनलाइन अर्जही करू शकतात.

Advertisement

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकरी शेतात काम करीत आहे. ह्या साथरोगामध्ये शेतकरी बँकेत जाऊन पीक कर्ज घेऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) तसेच जिल्हा अग्रणी बँक, अहमदनगर (Central Bank Of India / सेंट्रल बँक ऑफ इंडिया) यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी ऑनलाइन पीक कर्जासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी दिली आहे.

Advertisement

या ऑनलाईन पीक कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2021-22-ahmednagar-district/ या लिंकवर खरीप पीक कर्जासाठी अर्ज करावयाचा आहे. या लिंकला अर्ज केल्यानंतर आपण दिलेल्या बँक शाखेकडून संबंधित अर्जदार शेतकर्‍यांना फोन करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी सद्यस्थितीमध्ये बॅंकेत जाण्याची आवश्यकता नसल्याचे श्री. वालावलकर यांनी कळविले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply