Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बसलाय 7 लाख कोटींचा फटका; अर्थमंत्री सीतारमण यांच्याकडे मदतीसाठी साकडे

मुंबई : देशातील सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन, आंशिक लॉकडाउन, कर्फ्यू, नाईट कर्फ्यू आणि तत्सम निर्बंधांमुळे मागील 40 दिवसांत देशांतर्गत व्यापाराला अंदाजे 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) आज जीएसटी आणि आयकर अंतर्गत देशभरातील व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना या संघटनेने पत्र पाठविले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/j6QQTZenPr” / Twitter

Advertisement

जीएसटी आणि प्राप्तिकरांच्या काही तारखा अलीकडेच वाढवल्याने दिलासा दिल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्र्यांची कॅटने आभार मानले आहेत. पत्रात म्हटले आहे की, देशात लॉकडाऊनमुळे दुकाने आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. यामुळे त्यांचे पैसे येणे बंद झाले आहेत. व्यापाऱ्यांना विविध प्रकारच्या कौटुंबिक आणि व्यवसायाच्या गरजा भागवाव्या लागतात. त्यांना जमा झालेल्या भांडवलातून कर्मचार्‍यांचे पगार, दुकान आणि गोदाम भाडे द्यावे लागतील. त्यामुळे हा काळ त्यांच्या व्यवसायाच्या भवितव्यासाठी अत्यंत कठीण झाला आहे.

Advertisement

आर्थिक भार आणि नियमांचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने तातडीने काही पावले उचलण्याची गरज आहे, असा आग्रह कॅटने सीतारमण यांना केला. त्याचबरोबर जीएसटी आणि प्राप्तिकर अंतर्गत एकतर कर भरावा लागेल किंवा रिटर्न भरणे आवश्यक आहे अशा सर्व वैधानिक तारखा 31 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढविण्यात याव्यात असेही पत्रात म्हटले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/VczsX7BFCW” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply