Take a fresh look at your lifestyle.

हनीमूनच्या रात्री नवरा खोकला, नवरीने ठोकली धूम, वाचा ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट..!’

मुंबई : कोरोना व्हायरसने नागरिकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाची भीती मनात बाळगून प्रत्येक जण आयुष्य जगत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने मोजक्या उपस्थित विवाह सोहळे होत आहेत. मात्र, कोरोनाची भीती मनात पक्के घर करून बसल्याने एकमेकांबद्दल अविश्वास वाढला आहे.

Advertisement

अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली. या राज्यातील धनबाद येथे हनीमुनच्या रात्रीच एक नववधु नवरदेवाला सोडून पळून गेली. महत्वाचं म्हणजे, बराच काळ नवरदेवाला याबाबत काहीही माहिती नव्हती. या हनीमुनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

Advertisement

प्रत्येक नव्या जोडप्यासाठी त्यांची हनीमूनची रात्र ही अतिशय खास असते; पण याच दिवशी (रात्री) नववधू पळून गेली तर.. तर त्याचं झालं असं, की धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत खोलीतून बाहेर आली आणि पळून गेली.

Advertisement

बराच वेळ झाला, तरी नववधु न आल्याने एकच गोंधळ उडाला. शंकेची पाल मनात चुकचुकली, म्हणून नवरीचा शोध सुरू केला. बराच काळ शोधाशोध केल्यानंतर सासरहून नवरीच्या माहेरी फोन लावण्यात आला. तेव्हा समजलं, की ती माहेरी पळून गेली.

Advertisement

नेमकं असं काय घडलं? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. तर झालं असं.. नवजोडप्याच्या हनीमुनमध्ये कोरोनाने खो घातला. हनीमुनच्या रात्री नवरदेव खोकू लागला. अचानक नवरदेव खोकु लागल्यामुळे नववधु घाबरली. कुणालाही काहीही न सांगता माहेरी निघून गेली.

Advertisement

येड्यांचा बाजार! कोरोनावरील औषध समजून पितात घाण पाणी

Advertisement
Advertisement

Leave a Reply