Take a fresh look at your lifestyle.

झाला की घोटाळा : रुग्णांच्या जीवाशी खेळतानाच ऑक्सिजन सिलेंडरमध्येही झालाय महाघोटाळा..!

पटना : बिहार राज्य म्हणजे घोटाळ्यांचे आगार. इथे कोणताही पक्ष किंवा नेता सत्तेत येवो, समवेत घोटाळा ठरलेला आहे. आताही या राज्यात करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. सध्या ही फ़क़्त एक बातमी असून यावर चौकशी आणि तपास झाल्यावरच शिक्कामोर्तब होणार आहे.

Advertisement

या कोरोना साथीच्या काळातही बिहारमधील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात आणखी काही ‘खेळ’ सुरू आहे. पीएमसीएचमध्ये ऑक्सिजनच्या गरजेच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटीने जास्त वापर केला गेल्याची माहिती पुढे आलेली आहे. पटना हायकोर्टाच्या निर्देशानुसार यावर गठित चौकशी समितीने याचा पर्दाफाश केला आहे. पाटणा उच्च न्यायालयात पीएमसीएच येथे ऑक्सिजन वापराचा अहवाल सादर करण्यात आला. 21 एप्रिल ते 2 मे 2021 दरम्यान पीएमसीएच येथे 348 ऑक्सिजन सिलिंडर वापरले गेले आहेत. इथे 150 सिलिंडरची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

कोर्टाने नियुक्त केलेले कोर्टमित्र अ‍ॅडव्होकेट मृगांक माउली यांनी आपल्या अहवालात याचा खुलासा केला आहे. पीएमसीएचमधील ऑक्सिजन ऑडिट स्वतंत्र संस्थेद्वारे होणे आवश्यक आहे, अशी शिफारस कोर्टमित्राने उच्च न्यायालयात केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. इतर ऑक्सिजन टाक्या मग नेमक्या गेल्या कुठे, हाही कळीचा मुद्दा बनला आहे. या घोटाळ्यावर सोशल मिडीयामध्ये चर्चा सुरू झाली असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/VczsX7BFCW” / Twitter

Advertisement

अहवालात पीएमसीएचच्या डॉक्टरांकडून डेटा गोळा करून काही खळबळजनक खुलासे केले गेले आहेत. दिवसाच्या तक्त्यानुसार कोविडच्या रुग्णांची संख्या 127 होती. त्यापैकी सामान्य श्वसन 125 रुग्ण (दररोज 1 सिलिंडर) आणि 2 गंभीर गंभीर श्वसन (दररोज 3-4 सिलिंडर) असलेले रुग्ण होते. म्हणजेच 24 तासांत त्या 127 रूग्णांना जास्तीत जास्त 150 सिलिंडरची आवश्यकता होती. परंतु चार्टनुसार 348 सिलिंडर त्यांच्यावर खर्च केले गेलेले आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की कोणत्या रुग्णावर किती ऑक्सिजन सिलिंडर वापरले गेले याचीही माहिती तपासणी पथकाला सादर केलेली नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/8tQ7dXhatt” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply