Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : आली की सिंगल डोस करोनाकवच लसही; पहा किती टक्के आहे प्रभावी

दिल्ली : करोना विषाणूपासून संरक्षण मिळण्यासाठी एक नाही तर दोन-दोन लसचे डोस घ्यावेच लागतात. त्यामुळे दोन्ही डोस वेळेत मिळण्याचे मोठे आव्हान जगासमोर आहे. अशावेळी ही एक दिलासादायक बातमी आहे. कारण, एक अशीही लस आलेली आहे जिचा फ़क़्त एकाच डोस संबंधित व्यक्तीला करोनाकवच देणार आहे. या लसची प्रभावी ठरणारी टक्केवारीही सुमारे 80 टक्के आहे.

Advertisement

आपल्या भारतात नाही अजूनही अशी लस उपलब्ध. मात्र, आणखी काही महिन्यात अशी लस आपल्याकडे मिळण्याची शक्यता आहे. हा फ़क़्त त्याला केंद्र सरकारकडून लवकरच मान्यता मिळावी. इतकेच. तर या लसचे नाव आहे स्पुटनिक लाईट. रशियाने कोरोनाची सिंगल डोस व्हॅक्सीन तयार करण्यास यश मिळवले असून सिंगल शॉट लाइट व्हॅक्सीनला मान्यता मिळाल्याने अशी ही जगातील पहिलीच करोना लस ठरली आहे. स्पुतनिक लाइट मॉस्कोच्या गमालय संशोधन संस्थेने बनवली असून रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDFI) यांनी यासाठी अर्थसाह्य केलेले आहे. या लसचे मुद्दे असे :

Advertisement
 • या लसची किंमत 10 डॉलरपेक्षा कमी म्हणणे सुमारे 730 रुपये असेल
 • रशिया, युएई आणि घाना येथे फेज-3 चाचणीमध्ये 7000 लोकांचा सहभाग 
 • 28 दिवसांनंतर त्याच्या डेटाचे विश्लेषण केल्यावर सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे आढळले आहे
 • अनेक डबल डोस लसींपेक्षा ही लस अधिक प्रभावी आहे
 • लस दिलेल्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्के वाढल्या
 • स्पुतनिक लाइटला 2 ते 8 डिग्री टेम्प्रेचरवर स्टोअर करावे लागते
 • या लसमुळे कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीनविरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप होतात
 • स्पुतनिक लाइट ही व्हॅक्सीन 79.4% प्रभावी आहे
 • स्पुतनिक फॅमिलीची नवीन व्हॅक्सीन असल्याने भारतात मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे
 • ही लस विषाणूच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply