Take a fresh look at your lifestyle.

युट्यूब करतंय या नवीन फिचरची चाचणी; ‘ते’ लोकप्रिय व्हिडीओ शोधणे होईल आणखी सोपे..!

पुणे : यु ट्यूब (YouTube) एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. या फिचरमुळे यु ट्यूब ऑटोमॅटीकली वापरकर्त्याच्या मूळ स्थानिक भाषेमध्ये व्हिडिओ शीर्षक, वर्णन, मथळा इ. बदलेल. हे फिचर सध्या इंग्रजीमधून पोर्तुगीजमध्ये अनुवाद करत आहे. यु ट्यूबचे हे वैशिष्ट्य वेब आणि फोन ॲप दोन्हीमध्ये कार्य करते.

Advertisement

यु ट्यूबच्या या फिचरबद्दल सर्व काही अद्याप स्पष्ट नाही. परंतु असे दिसते की एकदा हे फिचर फेमस झाल्यावर वापरकर्ते त्यांच्या स्थानिक भाषेत व्हिडिओ शोधू शकतात. यावर, वापरकर्त्यांना लोकप्रिय चॅनेलचे इंग्रजीमध्ये लिहिलेले शीर्षक त्यांच्या स्वत:च्या भाषेत दिसू शकते.

Advertisement

आत्ता, युट्यूबवर इंग्रजी मजकूर शोधल्यानंतरही वापरकर्ते स्थानिक भाषेमध्ये परिणाम पाहू शकतात. अँड्रॉइड पोलिसांच्या अहवालानुसार या फिचरची अद्याप चाचणी घेण्यात येत आहे. हे सध्या केवळ निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले गेले आहे.
यु ट्यूब इतर बऱ्याच भाषांसाठी याचा सपोर्ट जोडू शकते. याबाबत यूट्यूबची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने याबद्दल अधिकृतपणे काहीही शेअर केलेले नाही. अहवालात असे म्हटले आहे की नवीन फिचर भाषांतर पॉपअपसह येते. गूगल ट्रान्सलेशन एआय वापरुन ते वेब आणि मोबाईल ॲप्सवर उपलब्ध असेल.

Advertisement

या पॉपअपवर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ शीर्षक, वर्णन, मथळा इ. वापरकर्त्याच्या मूळ भाषेत बदलले जातील. कंपनी त्यात आणखी बऱ्याच भाषांना पाठबळ देण्यावर काम करत आहे. जे इंग्रजी बोलत नाहीत त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरेल. अहवालानुसार, यूट्यूबवर इंग्रजी न बोलणारे २ अब्ज वापरकर्ते आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
1 Comment
  1. […] युट्यूब करतंय या नवीन फिचरची चाचणी; ‘त… […]

Leave a Reply