Take a fresh look at your lifestyle.

करोना लसीकरण कोमात आणि वानवळा दिला जातोय जोमात; पहा कशी आहे परिस्थिती

अहमदनगर :

Advertisement

जगभरात करोनाची दुसरी लाट आल्यावर जागे झालेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेला लसीकरण करून घेण्यातील अडचणी आणि अडथळे यांचीच शर्यत पार करता आलेली नाही. लसीकरण करण्यासाठी ऑनलाइनला स्लॉट मिळत नसतानाच ऑफलाईनमध्ये होणारी मोठी गर्दी हीच डोकेदुखी बनली आहे. येईल त्याला डोस देण्यासह स्लॉट दिलेला असतंही वेळेत लस दिली जात नसल्याने सध्या लसीकरण केंद्र हेच प्रमुख स्प्रेडींग सेंटर बनलेले आहेत. दुर्दैवाने दररोज माध्यमातून याबाबत बातम्या येऊनही जिल्हा प्रशासनाला यातून मार्ग काढता आलेला नाही.

Advertisement

‘नागरिकांची गर्दी’ होत असल्याच्या बातम्या येत असतानाच जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग याप्रकरणी नेमके काय करीत आहे, याचाही ताळमेळ जुळेनासा झाला आहे. कारण, लसीकरण केंद्रावर होत असलेल्या गोंधळ आणि गर्दीमुळे याच ठिकाणाहून करोना विषाणूचा प्रचार-प्रसार वेगाने होण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे. त्यामुळे अनेकांनी अजूनही अशा पद्धतीने लस घेण्याचे टाळले आहे. त्याचवेळी ऑनलाइनला कोविन रजिस्ट्रेशन करूनही अपॉइंटमेंट स्लॉट मिळण्याची शक्यता 5 टक्केही नसल्याचे चित्र आहे.

Advertisement

सध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या सापडत आहे. त्यातच लस वितरणात गोंधळ झालेला आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लस उपलब्ध असल्याचे दिसत असतानाच दक्षिण नगर जिल्ह्यात लस केंद्रांवर अनेकदा लस नसल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिक रात्री दहा वाजता जाऊन रांगेत झोपत आहेत. अशा पद्धतीने मग रात्रीच मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. पहाटे त्यात आणखी भर पडल्यावर ही गर्दी नियंत्रणाच्या बाहेर जाते. अशावेळी करोना प्रोटोकॉल बासनात गुंडाळला गेल्याने हेच करोना विषाणूच्या फोफावण्याचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

Advertisement

हे सर्व रोखण्यासाठी सर्व गावांमध्ये लसीकरण शिबीर घेऊन आणि योग्य नियोजन करून लस वितरण आणि डोस देण्याचे काम होने आवश्यक आहे. सध्या येथील गर्दीमुळे अनेकांना करोना झाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कधी आणि कशी लक्ष घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

कोपरगाव : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड प्रतिबंध लसीकरणासाठी १८ ते  ४५ वयाच्या नागरिकांनी आज पहाटे साडे चार वाजेपासूनच लांबच-लांब रांगा लागली असल्याने तेथे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.त्यातच लसीकरण केंद्रात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने आरोग्य प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यातच भर म्हणजे या ठिकाणी लसीकरणासाठी लसींची संख्याही मर्यादित भेटत असल्याने आरोग्य प्रशासनाला नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करत लस घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी केले.

Advertisement

राहुरी : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी राहुरी शहरात गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. लसीची संख्या मर्यादित असल्याने तासोन््तास रांग लावून उभे राहिलेल्या काही नागरिकांना माघारी जाण्याची वेळ आली. तालुक्याचे ठिकाण असलेल्या राहुरी शहरातील भागिरथीबाई कन्या शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडला. लस मिळेल या अपेक्षेने गेल्या पाच दिवसांपासून शहरातील नागरिक लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत होते. मात्र, लस शिल्लक नसल्याचा फलक पाहून नागरिकांना माघारी जाण्याची वेळ आली होती.

Advertisement

मिरजगाव (ता. कर्जत) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लस घेण्यासाठी मिरजगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजल्यापासूनच ग्रामस्थ टोकन घेण्यासाठी रांगेत थांबले होते. ग्रामीण भागातून तर टेम्पो भरून पहाटेच लोक नंबर लावण्यासाठी आले होते. सरकारी दवाखाना ते मुंजोबा मंदिरापर्यंत रांग लागली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

Advertisement

चांदा (ता. नेवासा) : प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गुरुवारी लसीकरणासाठी २०० डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाने वेग घेतला. मात्र लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ लसीकरण बंद झाले होते. सोनई पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र करपे यांनी गर्दी वर नियंत्रण आणल्यानंतर लसीकरण सुरू झाले. नागरिकांनी गुरुवारी गर्दी केल्याने सकाळी काही काळ तणाव झाला होता. 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply