Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाऊन संपल्यावर फिरा जगभर, तेही सरकारी खर्चाने; पहा कोणाला मिळतोय लाभ

दिल्ली :

Advertisement

करोना विषाणू आला आणि जगभर मुशाफिरी किंवा कामानिमित्त भटकणाऱ्या मंडळींना ब्रेक लागला. अगदी घराच्या बाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. आता दुसऱ्या लाटीतही अवघे जग पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यागत आहे. अशावेळी पर्यटन करणाऱ्यांना सरकारी मदतीची योजना चालू झाली आहे.

Advertisement

थांबा.. हे वाचून लगेचच जगभर फिरायला निघू नका. कारण, ही योजना महाराष्ट्र राज्य सरकार किंवा भारत सरकारने आणलेली नाही. इथे आपल्याकडे अत्यावश्यक औषधे, ऑक्सिजन आणि लस मिळण्याची शक्यता कमी असताना अशी भन्नाट योजना येण्याची 1 टक्के तरी शक्यता आहे का? नाहीच ना..! तर, ही योजना आहे फ्रांस सरकारची. आपण आता या योजनेचे मुद्दे पाहूया :

Advertisement
  1. योजनचे नाव आहे हाॅलिडे व्हाऊचर्स
  2. राेम, नीस, लिस्बेन, अॅम्स्टर्डम, अजाशियाे इत्यादी समुद्र किनारे व प्रमुख पर्यटन स्थळांना भेट दिल्यास या योजनेतून सरकारी अर्थसाह्य मिळणार आहे
  3. वय 18-25 वर्षीय तरुणांंना या याेजनेचा लाभ घेता येणार
  4. येणे-जाणे, भाेजन आणि 75 टक्के खर्च सरकार उचलणार
  5. खर्चाची कमाल मर्यादा 200 युराे (सुमारे 18 हजार रुपये) एवढी असणार

जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता येण्याच्या उद्देशाने नॅशनल सेंटर फाॅर युनिव्हर्सिटिज अँड स्कूल्ससाेबत संयुक्त याेजना बनवण्यात आलेली आहे. याद्वारे योजनेचा प्रचार सुरू आहे. मागच्या वर्षीही सुमारे 4 हजार तरुण-तरुणींनी या योजनेचा लाभ घेतला होता. याेजनेनुसार पहिल्यांदा नाेंदणी, खर्चाचा तपशील द्यावा लागेल. त्याची पडताळणी झाल्यानंतर मदत मिळणार असल्याचे फ्रांस सरकारने म्हटलेले आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply