Take a fresh look at your lifestyle.

कोरोना अपडेट : देशातील ‘या’ तीन राज्यात सर्वात जास्त कोविड 19 लस जातेय वाया

मुंबई : देशात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून दररोज ३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत आहे. कुठे ऑक्सिजनची कमतरता, कुठे बेडची कमतरता, कुठे औषधांची कमतरता तर कुठे लसीची कमतरता जाणवत आहे. कोरोनाच्या या थैमानात लसीकरण प्रक्रिया आज आशेचा किरण असून ही मोहिम वेगवान करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असताना, अशी काही राज्ये आहेत जिथे लस मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये लक्षद्वीप, तामिळनाडू आणि आसामसारख्या राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असून तेथे लसीचा अपव्यय सर्वाधिक असल्याचे भारत सरकारने जाहीर केले आहे.

Advertisement

लक्षद्वीपमध्ये एकूण लसीपैकी ९.७६ टक्के, तामिळनाडूमध्ये ८.८३ टक्के आणि आसाममध्ये ७.७० टक्के लस नष्ट झाली आहे. भारतात लस उपलब्ध नसल्यामुळे आणि लसीचा अपव्यय होत असल्याने लसीकरणाची संख्या कमी आहे. दोन एप्रिल रोजी एकाच दिवशी देशात कोरोना लसीचे ४२ लाख डोस दिले गेले, तेथे गेल्या आठवड्यात एकाच दिवशी सरासरी १८ लाख डोस घेतले गेले, एवढी संख्या यामुळे रोडावली आहे.

Advertisement

कोरोना लसीकरणामध्ये केरळ सर्वात पुढे असून केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, वाया गेलेल्या लसीच्या डोसचा वापर करून, उपलब्ध डोसपेक्षा जास्त लोकांना लस दिली गेली. केरळमध्ये लसचे ७३ लाख ३८ हजार ८०६ डोस प्राप्त झाले. केरळने आपल्या वाया गेलेल्या लसीच्या डोसचा वापर करुन आपल्या नागरिकांसाठी ७४ लाख २६ हजार १६४ डोस दिले.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply