Take a fresh look at your lifestyle.

येड्यांचा बाजार..! कोरोनावरील औषध समजून पितात नदीतील घाण पाणी, पहा कुठे घडलाय हा प्रकार..?

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे लोक हतबल झालेत. दवाखान्याचा खर्च आवाक्याबाहेर गेला असून, सर्वसामान्यांना तो परवडत नाही. कोरोनावर रामबाण औषध आजही वैज्ञानिकांना सापडलेले नाही. जेथे विज्ञान संपते, तेथून चमत्कार सुरु होतो. कोरोनावर ठोस औषध सापडलेलं नाही. मात्र, काहींनी देशी उपाय सुरु केले आहेत. अशात कुणी काढ्याचा देशी उपाय करत आहे, तर कुणी दुसरच काही शोधत आहे. त्यातून काही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. ही कहाणी अशाच एका गावाची आहे, ज्यांनी कोरोनावर रामबाण उपाय सापडल्याचे समजून चक्क नदीतील घाणेरडं पाणी औषध म्हणून सेवन केलं..

Advertisement

ही घटना आहे, मध्य प्रदेशमधील गुना या गावात बमोरी ब्लॉकमधील. जोहरी गावातून ‘बरनी’ नदी वाहते; पण दोन-तीन महिन्यांपासून नदी कोरडी पडली आहे. मात्र, कोरड्या नदीत खड्डा केला, तर त्याला लगेच पाणी लागतं.

Advertisement

नदीतील काही खड्ड्यांमध्ये आधीच पाणी भरलेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून हे पाणी भरलेलं असल्याने ते खराब झालेले आहे. कोरोनावरील औषध समजून गावकरी हे पाणी पिऊ लागले.. घाणेरड्या पाण्यामुळे कोरोना राहिला बाजूला, इतर साथीच्या आजाराचाच धोका वाढू शकतो. मात्र, अंधविश्वासामुळे लोक हे पाणी औषध समजून पित आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण काही केल्या लोक ऐकायला तयार नाहीत.

Advertisement

घाणेरडं पाणी पिणाऱ्या गावातील लोकांना अधिकाऱ्यांनी समजावले, की कुणीतरी नदीत खड्डा केला असेल आणि पाणी लागल्यावर अफवा पसरली. यात चमत्कारासारखं काहीच नाही. हा अंधविश्वास आहे; पण गावातील लोकांनी अधिकाऱ्यांचं काही एक ऐकलं नाही. ते नदीतील खड्ड्यातील पाणी पित राहिले.

Advertisement

नदी जंगलाच्या आत आहे आणि ज्या ठिकाणी पाणी निघत आहे, ते ठिकाण नदीत फार आत आहे. त्यामुळे तिथे पाणी लागणं, यात काही चमत्कार नाही. मात्र, तरीही लोक या अफवेवर विश्वास ठेवून पाणी पित आहेत. तर काही लोक पूजा करून या पाण्यात धान्यही अर्पण करत आहेत. त्यामुळे हे पाणी आणखीच दूषित होत असून, लोक कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
Advertisement

Leave a Reply