Take a fresh look at your lifestyle.

गरीबांच्या पोटाची सोय झाली.. केंद्र सरकारनं केलीय ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्या लोकांचे रोजच्या खाण्या-पिण्याचे वांधे झाले आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 एप्रिलला देशातील 80 कोटी जनतेला ‘गरीब कल्याण योजने’अंतर्गत मोफत धान्यपुरवठा करण्याची घोषणा केली होती.

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेंअतर्गत पात्र नागरिकांना दोन महिन्याचं धान्य मोफत देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं धान्य वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.

Advertisement

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयाचा फायदा देशातील 79 कोटी 88 लाख जनतेला होणार आहे. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यातील अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागांद्वारे त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारनं 79 कोटी 88 लाख लोकांना दोन महिन्यांचं धान्य मोफत देण्याचं जाहीर केल आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारवर 25 हजार 333 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर गरीब कल्याण योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत धान्य वितरण सुरु कऱण्यात आलं आहे.

Advertisement

महाराष्ट्र सरकारची घोषणा!
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करतानाच, गोरगरीबांसाठी 5476 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. राज्यात निर्बंध लागू झाल्यापासून गोरगरीबांना एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply