Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानची दर्यादिली.. ‘राधे’ची कमाई देणार ‘या’ कामासाठी..!

मुंबई : कोरोनामुळे भारतीय नागरिक मेटाकुटीला आले आहेत. बहुतांश ठिकाणी वैद्यकिय सुविधांचा अभाव जाणवत आहे. अशात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यात काही ‘बॉलिवूड सेलिब्रिटी’चाही समावेश आहे. त्यापैकीच एक आहे, ‘दबंग’ हिरो सलमान खान!

Advertisement

अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या दर्यादिलीबाबत अनेक किस्से चर्चेत असतात. संकटात असणाऱ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारे मदत करण्यात सलमान खान नेहमीच पुढे असतो. आता कोरोना संकटात सर्वसामान्य माणूस हतबल झालेला असताना, सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे.

Advertisement

सलमान खान याचा आगामी चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted bhai) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमान खान फिल्म्स (SKF) आणि झी स्टुडिओज (Zee studious) यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.

Advertisement

सलमानचा हा आगामी चित्रपट येत्या ‘ईद’ला, म्हणजेच 13 मे रोजी ओटीटी (OTT), तसेच जगभरात विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani), जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Advertisement

चित्रपट निर्मात्यांनी ‘राधे’ या चित्रपटातून होणारी कमाई कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी देण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांच्या मते, ‘देश सध्या एका वाईट परिस्थितीतून जात आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून कोविड-19 (covid-19) शी लढण्यासाठी सगळ्यांनीच एक पाऊल पुढे आलं पाहिजे. आम्ही फक्त प्रेक्षकांच मनोरंजन करण्यावर विश्वास ठेवत नाही, तर देशात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे, की ‘राधे’ चित्रपटाच्या कमाईतून कोरोनग्रस्तांना त्यांच्या उपचारांसाठी मदत होईल.’

Advertisement

दोन्ही कंपन्यांनी ‘आम्ही लोकांची मदत करण्यासाठी तत्पर आहोत’ असं म्हटलं आहे. ‘सलमान खान फिल्म्स’च्या प्रवक्त्याने म्हटलं आहे, की ‘आम्ही या महान क्षणाचे भागीदार होण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यातून कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही थोडफार योगदान देऊ शकू.’

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply