Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार विकणार ‘या’ बँकेतील हिस्सा, पहा ग्राहकांचे काय होणार..?

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बँकाच्या खासगीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार सरकारी बँका धडाधड विकण्याचा सपाटा लावला आहे. बँकांचे खासगीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट आणि CCEA (Cabinet Committee on Economic Affairs)ची नुकतीच बैठक झाली. त्यात आयडीबीआय बँकेच्या संपूर्ण समभाग विक्रीस मान्यता देण्यात आलीय. CCEA ने त्यावर शिक्कामोर्तब केलेय.

Advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही बजेट भाषणात बँकेचा उल्लेख केला होता. तसेच, बँकेला विकण्याचाही विचार असल्याचं सांगितलं होतं. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि सरकारने IDBI बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘इक्विटी कॅपिटल’च्या (Equity capital) स्वरूपात 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. आता एलआयसीकडे या बँकेचे अधिकार आहेत.

Advertisement

आयडीबीआय या सरकारी बँकेची 1964 मध्ये स्थापन झाली. ‘एलआयसी’ने 21000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आयडीबीआयचा 51 % हिस्सा खरेदी केला होता. त्यानंतर एलआयसी आणि सरकारने एकत्रितपणे 9300 कोटी रुपये आयडीबीआय बँकेला दिले. आयडीबीआय बँकेत सरकारचे सुमारे 45.48 टक्के भागभांडवल आहे आणि एलआयसीने ताबा मिळवल्यानंतर ती खासगी बँक म्हणून वर्गीकृत केली गेली.

Advertisement

CCEA च्या बैठकीत ‘आयडीबीआय’ने भागभांडवल विक्री आणि हस्तांतरण व्यवस्थापन नियंत्रण, यास मंजुरी दिली. सध्या सरकारकडे 45.48 टक्के आणि एलआयसीकडे 49.24 टक्के हिस्सा आहे. एलआयसी बोर्डाने यापूर्वीच बँकेतील हिस्सा कमी करण्यास मान्यता दिली होती. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात ‘आयडीबीआय’ बँकेचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर 10 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने ‘आयडीबीआय’ला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून काढले.

Advertisement

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या नोकर्‍या पूर्वीप्रमाणेच राहतील. तसेच सर्व ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सुविधा मिळत राहतील.

Advertisement

आयडीबीआय बँक पाच वर्षांनंतर फायद्यात आलीय. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 1,359 कोटी रुपयांचा नफा झाला. एका वर्षापूर्वी 2019-20 मध्ये बँकेचे 12,887 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 31 मार्च 2021 रोजी बँकेचा सकल एनपीए सुधारून 22.37 टक्के झाला. याच काळात वर्षभरापूर्वी 27.53 टक्के नोंद झाली होती. निव्वळ एनपीए एक वर्षापूर्वी सुधारून 1.97 टक्के झाला होता, जो एक वर्षापूर्वी 4.19 टक्के होता.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply