Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादीने काढली मोदींच्या ‘त्या’ योजनेची आठवण; पहा ग्रामीण विकासाचे काय वास्तव दाखवलेय

पुणे : एकेकाळी स्मार्ट सिटी आणि स्मार्ट व्हिलेज हे या देशातील परवलीचे शब्द बनले होते. आता गावोगावी पिण्याचे मुबलक पाणी असणार, ग्रामस्थांना सर्व सुविधा मिळणार आणि सगळीकडे गावात विकासाचा टेंभा मिरवला जाणार. मात्र, पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फ़क़्त घोषणाबाजी जोरात करताना वास्तवात काहीही कार्य करण्याचे टाळले. उलट गावोगावी आणखी बकालपणा वाढला. त्याच योजनेची आठवण काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केंद्रातील सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा उघडे पडण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

(1) NCP on Twitter: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ’सांसद आदर्श ग्राम योजनेची’ घोषणा केली होती. प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श करुन दाखवावं, हा योजनेचा उद्देश होता. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावं तर दत्तक घेतली गेली… पण विकास काही झाला नाही.. @PMOIndia @narendramodi https://t.co/o3W7tsPeo8” / Twitter

Advertisement

व्हिडिओ शेअर करून राष्ट्रवादीने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये ’सांसद आदर्श ग्राम योजनेची’ घोषणा केली होती. प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श करुन दाखवावं, हा योजनेचा उद्देश होता. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावं तर दत्तक घेतली गेली… पण विकास काही झाला नाही..

Advertisement

पुढे त्यांनी म्हटले आहे की, आज इतक्या वर्षांनंतरही ही गावं मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. यातील काही खासदार तर मोदी सरकारमध्ये मंत्रीपदे भूषवत आहेत.. या बड्या मंत्र्यांनी गावं दत्तक घेण्याचा मोठेपणा केला पण विकासकामे करण्याची वेळ आल्यावर या गावांकडे पाठ फिरवली. आरोग्यसुविधा, शौचालये, शाळा, पिण्याच्या पाण्याची सोय, वीज आदी सुविधांची गावात वानवा असल्याचे तेथील नागरिकांचेच म्हणणे आहे. त्यामुळे पंतप्रधान व त्यांचे मंत्री स्वतः दत्तक घेतलेल्या गावांचा विकास करू शकले नाहीत तर देशाचा विकास कसा करणार? हा मूलभूत प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply