Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अॅड. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध; पहा नेमके काय आहेत त्यांचे मुद्दे

पुणे : मराठा समजला आरक्षण न मिळू देण्यासाठी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दखल केली. त्यांच्या बाजूने जयश्री पाटील यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली. त्याच अॅड. सदावर्ते यांनी बीबीसी मराठी यांच्याकडे अनेक मुद्द्यांवर आपली बाजू मांडली आहे. आपण पाहूयात त्यांनी नेमके काय मुद्दे मांडलेत ते.

Advertisement
  1. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय हा योग्य आहे आणि हा आमचा विजय आहे. जातीच्या विरूध्द घाणेरड्या राजकारणाची आज पराभव झाला आहे. हा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे.
  2. आरक्षणासाठी निघालेले 52 मोर्चे साखर कारखान्यातील लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले असल्याने मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या.
  3. मागास म्हटलं, म्हणून ते मागास ठरत नाहीत. पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते. मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही. गरीबी हटावचा नारा देत तुम्ही आरक्षण आणू शकत नाही. हा फक्त राजकीय मुद्दा आहे.
  4. भारतीय संविधानाच्या मूलतत्त्वानुसार आरक्षण हे मोगलाईप्रमाणे देऊ शकत नाही. सगळ्या राजकीय पक्षाचा या आरक्षणाला विरोध होता. आंबेडकरी संघटनेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत सर्व राजकीय पक्षांचा याला विरोध होता.
  5. मराठा नावाची एक जात नाही. या अनेक जाती आहेत. तुम्ही सर्वांना एकत्र करून एक जात करू शकत नाही. हे आम्ही सिध्द केलं.

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply