Take a fresh look at your lifestyle.

सोप्पय की.. सुती कपडा जमिनीत पुरून कळतेय जमिनीची सुपीकता; पहा कसा केला जातो हा प्रयोग

पुणे :

Advertisement

जमिनीची सुपीकता किती आहे आणि त्यामध्ये कोणते घटक किती आहेत हे तपासण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते. अगदी काही मोजके आणि महत्वाचे घटक तपासणीसाठीही माती-पाणी परीक्षण कीट लागते. मात्र, एक अशीही पद्धत आहे. ज्याद्वारे अगदीच सहजपणे आपण जमिनीची सुपीकता आणि त्यामधील जीवाणू यांची माहिती मिळवू शकतो. तो प्रकार आहे सुती कपडा जमिनीत पुरून ठेवण्याचा.

Advertisement

होय, सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या दोन्ही देशात हा प्रकार सर्रास वापरला जात आहे. येथे सिटिझन सायन्स प्रोजेक्टअंतर्गत शेतकऱ्यांना सुती कपडे जमिनीत पुरण्यासाठी दिले जात असून त्याद्वारे जमिनीचा सुपीकता निर्देशांक तपासाला जात आहे. टी-बॅग आणि कपडा यासाठी जमिनीत पुरला जातो. जमिनीत पुरलेले कपडे एक आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर काढून पाहिले जातात. कपडा किती जीर्ण किंवा नष्ट झाला त्यावरूनही सहजपणे सुपीकता लक्षात येते. या प्रयोगातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. हा प्रयोग तिथे राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही त्यात सहभागी झाले आहेत.
  2. सूत किंवा कपाशी एक प्रकारच्या सेल्युलोजपासून (शर्करा) तयार होते. त्यामुळे सुती कपडा जमिनीतील जिवाणूंसाठी एक स्वादिष्ट भोजन ठरतो. 
  3. जिवाणूंचा या कपड्यावर हल्ला होताे. त्यात कपडा नष्ट होऊ लागतो. कपडा नष्ट झाल्यास अशी जमीन सुपीक म्हणता येईल. म्हणजेच अशा मातीत सर्व पोषक घटक अस्तित्वात असल्याची ती खूण आहे.
  4. जमिनीतून काढलेल्या कपड्याचे डिजिटल विश्लेषणही केले जाते. त्यातून मातीची गुणवत्ता कशी आहे, ती किती सुपीक आहे हे स्पष्ट होते.

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply