Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. महाराष्ट्र एटीएसने पकडले 7 किलो युरेनियम..!

मुंबई :

Advertisement

महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत 2 जणांना 7 किलो युरेनियमसह अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून युरेनियमची विक्री करण्यासाठी ग्राहकांना शोधत होते. जप्त केलेल्या युरेनियमची बाजारभावाने किंमत सुमारे 21 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मुंबईस्थित भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या युरेनियमची पडताळणी केली आहे. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात केली आहे.

Advertisement

एटीएसच्या म्हणण्यानुसार, जर हे युरेनियम चुकीच्या लोकांच्या हातात पडले तर त्याचा उपयोग स्फोटके बनवण्यासाठी केला जाऊ शकत होता. आरोपीने एका खासगी लॅबमध्येही या युरेनियमची चाचणी केली होती आणि लॅबने आरोपीला युरेनियमची शुद्धता तपासण्यास मदत केली होती. अशा पद्धतीने आता हे युरेनियम आले कोठून, कसे आणि कुठे-कुठे फिरले आणि नेमके कुठे जाणार होते याचा तपास पोलिसांचे पथक करीत आहे.

Advertisement

महाराष्ट्र एटीएस खासगी लॅबची तपासणी करीत आहे. तेथून या युरेनियमची शुद्धता तपासणी केली गेली होती. युरेनियमचा वापर संवेदनशील गोष्टी करण्यासाठी केला जातो. 1 किलो युरेनियमची किंमत सुमारे 3 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हा एक किरणोत्सर्ग पदार्थ आहे. याद्वारे अणूइंधन आणि बॉंब बनवला जातो. अनेकांना शालेय अभ्यासक्रमात या धातुबद्दल शिकवलेले असेल. मात्र, अशा पद्धतीने याची खरेदी-विक्री किंवा किरणोत्सर्ग पदार्थ बाळगणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे याचे नेमके धागेदोरे शोधण्याकडे पोलिसांची टीम कामाला लागली आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply