Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भारतात उभारले जाणार 270 किलोमीटरचे बोगदे; पहा नेमके काय म्हटलेय गडकरींनी

दिल्ली :

Advertisement

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशात 270 किमी लांबीचे बोगदा बनवण्याची योजना असल्याचे सांगितले आहे. यामध्ये 135 किलोमीटर डीपीआर तयार होत आहेत. 2026 पर्यंत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. बोगदा बांधणीच्या माध्यमातून देशाच्या सीमेपर्यंत वर्षभर रस्ता कनेक्टिव्हिटी राखली जाईल, वाहनांचा वेग वाढल्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल आणि प्रवास सुरक्षित राहील.

Advertisement

नितीन गडकरी यांनी बुधवारी रोड टनेलच्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये ही माहिती दिली. बोगद्याच्या क्षेत्रातील अलीकडील कल, नवकल्पना आणि पुढील उपाययोजनांवर आयोजित वेबिनारमध्ये आंतरराष्ट्रीय बोगद्याची संस्था आणि त्यांचे तज्ञ उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, बोगदा बांधकाम क्षेत्रात भारत जगात अग्रणी भूमिका बजावण्याची तयारी करत आहे. परंतु बोगदा बांधकामातील सर्वात मोठे आव्हान प्रकल्पांमध्ये लागणारी जास्त गुंतवणूक. केवळ टोल टॅक्स लावून बांधकाम कंपन्या गुंतवणूकीचे पैसे परत करू शकत नाहीत. म्हणून बोगद्याशेजारी स्मार्ट सिटी, पर्यटन स्थळे इत्यादी विकसित करून हे प्रकल्प व्यवहार्य करण्याच्या दृष्टीने सरकारचे विचार आहेत. भारतातील बोगदा बांधकाम क्षेत्रात मोठी संधी आहे.

Advertisement

गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय बोगद्याच्या तज्ञांना बोगद्याच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्य, मशीन्स आदींद्वारे बांधकाम खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास करण्यास सांगितले. कारण हिमालयात इको-सेन्सिटिव्ह झोन, जंगल आणि पर्यावरण आदींमुळे बोगद्याचे बांधकाम खूप आव्हानात्मक आहे. मागील वर्षी, जगातील 50 टक्के बोगदे केवळ चीनमध्ये बांधले गेले. वर्ल्ड रोड असोसिएशनच्या मते, जगात मागील वर्षी 5000 किलोमीटर लांबीचे बोगदे तयार करण्यात आले होते. त्यापैकी 50% बोगदे चीनमध्ये बनविलेले आहेत. याशिवाय आशिया, युरोप इत्यादी देशांमध्ये बोगद्याची उभारणी केली जाईल. भारतातील लोकसंख्या जास्त असल्याने रस्त्यावर गर्दीची दिसते. म्हणूनच तेथे विस्तीर्ण रस्ते आणि रुंद बोगदे तयार करण्याची गरज आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply