Take a fresh look at your lifestyle.

पत्रकार तांबडे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी; राज्य पत्रकार संघांची पोलिस अधिक्षकांकडे मागणी

अहमदनगर : दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना करण्यात आली आहे.  

Advertisement

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सचिव विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी इमेल व व्हाट्सएपद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना सदर निवेदन पाठविले असून या निवेदनाद्वारे दैनिक पुढारीचे ब्युरो चीफ पुरुषोत्तम सांगळे, राज्य पत्रकार संघाचे सदस्य सूर्यकांत नेटके, दिपक कांबळे, सचिन चोभे, सुदाम देशमुख यांच्यासह नगर शहरातील अनेक पत्रकारांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. 

Advertisement

दैनिक पुढारीचे उपसंपादक मुरलीधर तांबडे हे सोमवार दि.३ मे रोजी रात्री आपले कार्यालयीन कामकाज आटोपून केडगावला आपल्या घराकडे जात असतांना त्यांनी भांडण सोडविले. या कारणावरून मंगळवार दि. ४ मे रोजी सकाळी ८:३० ते ९ च्या सुमारास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना केडगाव येथील आरोपी मच्छीन्द्र घोगरे, तुषार घोगरे, राहुल ससाणे व विशाल कोतकर या ४ आरोपींनी जबर मारहाण केली. याबाबत अभिजित अजिनाथ तांबडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. 

Advertisement

तरी सदर आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार हल्ला विरोधी संरक्षण कायद्या अंतर्गत कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply