Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो..! कोरोना लस विकून ‘या’ कंपनीने कमावलाय तीन महिन्यांत 90 कोटी डॉलर्सचा नफा..

नवी दिल्ली : अख्ख्ये जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना, या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. मात्र, काहींनी या संकटातही आपल्या तुंबड्या भरण्याची संधी सोडली नाही. जगभरातील नागरिक कोरोना लसीची प्रतीक्षा करीत आहेत. श्रीमंतांनी पैशाच्या जोरावर लस मिळवली. मात्र, यात मरण झाले ते गरिबांचे..! कारण, एका कंपनीने कोरोना लसीचा अक्षरश बाजार मांडला. कोरोना संकटातही आपला व्यावसायिकपणा न सोडता, अवघ्या ३ महिन्यांत कोट्यवधींचा नफा या कंपनीने कमावला आहे.

Advertisement

गतवर्षी अनेक औषध कंपन्यांनी कोरोना लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु केले; मात्र त्यातून नफा मिळविणे हे ध्येय ठेवले नव्हते. मात्र, जगातील प्रसिद्ध औषध निर्माती कंपनी ‘फायझर’ने फक्त नफा मिळवणेच लक्ष्य ठेवले होते. कोरोना लसीने कंपनीच्या नफ्यात मोठे योगदान दिल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात या कंपनीने ३.५ अब्ज डॉलर्सची कमाई केल्याचे जाहीर केले आहे. ही कमाई कंपनीच्या एकूण महसुलाच्या एक चतुर्थांश इतकी आहे. गतवर्षी कोरोना काळात कंपनीने ‘रेकॉर्ड’ वेळेत लसनिर्मिती केली होती. अन्य औषध निर्माण कंपन्यांनी कोरोना लसीतून फायदा न मिळविण्याचा निर्णय घेतला असताना, फायझर कंपनी मात्र लसी विकून मालामाल झाली आहे.

Advertisement

कोरोना लसीतून कंपनीने नक्की किती नफा मिळविला, याचा खुलासा केलेला नाही. मात्र, नफ्यात २० टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट केल्याने हा नफा ९० कोटी डॉलर्स इतका असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Advertisement

जगात सर्वप्रथम ‘फायझर’ची कोविड लस तयार झाली होती. त्याबद्दल कंपनीची खूप तारीफ झाली. या लसीमुळे जगात अनेकांचे प्राण वाचले; पण मुळात ही लस श्रीमंत देशांनाच मिळाली. गरीब देशांनाही लस देणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते; पण तसे झाले नाही.

Advertisement

एप्रिलच्या मध्यापर्यंत जगातील श्रीमंत देशांनी ‘फायझर’च्या कोविड लसीच्या ७० कोटी पैकी ८७ टक्के डोस खरेदी केले होते. गरीब देशांना अवघे ०.०२ टक्के डोस मिळाले. असे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. कंपनीने आतापर्यंत ९१ देशांना ४३ कोटी लस डोस दिल्याचेही मंगळवारी (ता.4) जाहीर केले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply