Take a fresh look at your lifestyle.

‘5G’ मुळे पक्ष्यांच्या जिवाला धोका… सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत व्यक्त केलेत ‘हे’ धोके..!

नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञानामुळे माणसाचे जगणे सुसह्य तर झाले, मात्र त्याचे ‘साईड इफेक्ट’ही झाले. माहिती-तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टीमुळे निसर्ग चक्रावर परिणाम झाला. अक्षय कुमारच्या ‘रोबोट-2.0’ या चित्रपटात ही गोष्ट प्रकर्षाने दाखविण्यात आली आहे.

Advertisement

भारतात वेगाने इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सुरुवातीला भारतात 2G, नंतर 3G व सध्या 4G नेटवर्क सुरु करण्यात आले. मात्र, अजूनही म्हणावा तितका ‘नेट स्पीड’ मिळत नाही. त्यामुळे आता 5G नेटवर्कची तयारी सुरु झाली होती. मात्र, तत्पूर्वीच त्याला विरोध सुरु झाला आहे.

Advertisement

भारतात 5G इंटरनेट टॉवर टेस्टिंगवर (Tower Testing) बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी वकील ए. पी. सिंह यांनी सुप्रीम कोर्टात (Suprim court) एक याचिका दाखल केली आहे. भारतासह जगभरात 5G नेटवर्कला विरोध केला जात आहे. 5G नेटवर्क हे धोकादायक असल्याचा दावा या याचिकेत केला आहे.

Advertisement

याचिकेत व्यक्त केलेले धोके

Advertisement
  • 5G इंटरनेट गोपनियतेसाठी मोठे संकट आहे. युजर्संचा डेटा कुणीही सहज ‘हॅक’ (Hack) करू शकतो.
  • नेदरलँडमध्ये चाचणीदरम्यान शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. हेग शहरातही 5G नेटवर्क चाचणीदरम्यान जवळपास 300 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.
  • 2018 मध्ये चिनी कंपनी ‘हुवावे’ने गुरूग्राम, हरियाणा येथे 5G इंटरनेटची चाचणी केली होती. 5G नेटवर्कच्या टेक्नोलॉजीत ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन’चा (Electromagnetic Radiation) उपयोग केला जातो. यात कॅन्सरचा धोका मोठा वाढतो.
  • गर्भावस्थेदरम्यान मोबाइल रेडिएशनने गरोदर महिलासोबत छोट्या बाळावरही याचा परिणाम होतो.
  • 5G नेटवर्कची दहशतवाद्यांना मदत होईल. त्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

दरम्यान, टेलिकॉम कंपन्या सध्या 5G टेस्टिंगवर जोर देत आहेत. एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन- आयडिया टेस्टिंगवर काम करीत आहेत. जिओने नुकतेच ५७१२३ कोटी रुपयांचे ‘स्पेक्ट्रम’ (Spectram) खरेदी केले आहेत. यावरून कंपनीने २२ सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहे. रिलायन्स जिओने खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमचा वापर 5G सर्विस देण्यासाठी केला जाणार आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली, की स्वदेशी 5G टेक्नोलॉजी डेव्हलप करीत असून, अमेरिकेत ते टेस्ट केले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply