Take a fresh look at your lifestyle.

स्वस्ताई आली.. सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या तोळ्याचा भाव.!

मुंबई : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या चार लाखांवर गेली आहे. अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित केला आहे. केंद्र सरकारच्या ‘कोविड टास्क फोर्स’ने सरकारला देशव्यापी लॉकडाउनचा पर्याय सुचवला आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेनेही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे देशव्यापी लॉकडाउनची शक्यता गडद बनली आहे. त्याचा दबाव आज (ता. 5) कमॉडिटी बाजारातही दिसून आला. सोने-चांदीच्या किमतीत आज घसरण झाली.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange)वर सोन्याचा भाव ५० रुपयांनी कमी होऊन तो ४६,८२७ रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीतही ३०० रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६९,३२५ रुपये इतका खाली घसरला होता. मंगळवारी सोन्याचा भाव तब्बल ३२९ रुपयांनी घसरला होता, तर चांदीत ५५० रुपयांची घसरण झाली होती.

Advertisement

‘गुड रिटर्न्स’ वेबसाईटनुसार आज (बुधवारी) मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,५८० रुपये प्रति 10 ग्रॅम, तर २४ कॅरेटचा भाव ४५,५८० रुपये होता. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५,७९० रुपये झाला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४९,९९० रुपये भाव होता. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४,३२० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. त्यात २२० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५३० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३२० रुपये होता.

Advertisement

जागतिक बाजारात सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून आला. मंगळवारी सोन्याचा भाव १७७६ डॉलर प्रती औस इतका होता. त्यात ०.८८ टक्के घसरण झाली. चांदीतही १.४८ टक्के घसरण झाली. चांदीचा भाव २६.५६ डॉलर प्रती औंस होता. आज सोन्याचा भाव १७८०.८ डाॅलर प्रती औंस झाला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply