Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या रे.. कारण AP स्ट्रेन आहे 15 पट जास्त धोकादायक; पहा काय होतेय त्याने..!

पुणे :

Advertisement

सध्या करोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर शिथिलता कायम आहे. सगळीकडे औषधांचा तुटवडा, ऑक्सिजन सिलेंडरसाठी पळापळ आणि लसीकरण प्रक्रियेला लागलेला ब्रेक कायम आहे. त्याचवेळी आंध्रप्रदेश राज्यात करोनाचा नवा आणि 15 पट धोकादायक असा स्ट्रेन सापडला आहे.

Advertisement

एपी स्ट्रॅन (AP Strain)आणि एन440के (N440K ) असे नाव याला देण्यात आलेले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी (CCMB) शास्त्रज्ञांच्या मते हा खूप धोकादायक आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील ही करोना साखळी तोडणे खूप गरजेचे आहे. जर, ही लाट थोपवली गेली नाही, आणि याद्वारे AP स्ट्रेनचा विषाणू फोफावला तर, भारतात आणखी गंभीर परिस्थिती येऊ शकते.

Advertisement

AP स्ट्रेन विषाणूचे मुद्दे असे :

Advertisement
 1. आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे
 2. सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक 
 3. या स्ट्रेनने संक्रमित रूग्ण 3-4 दिवसात हायपोक्सिया किंवा डिस्पेनियाला बळी पडतात
 4. योग्य वेळी उपचार आणि ऑक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर रुग्णाच्या मृत्यूची शक्यता वाढते
 5. चिंताजनक बाब म्हणजे चांगली प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील या प्रकारासमोर अपयशी ठरत आहेत
 6. नवीन स्ट्रेनमुळे लोकांच्या शरीरात सायटोकीन स्टॉर्मची समस्या येते.
 7. हा स्ट्रेन तरूण आणि मुलांवर लवकर हावी होत आहे
 8. ची प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशा लोकांनासुद्धा हा स्ट्रेन सोडत नाही
 9. आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथे प्रथम या स्ट्रेनची ओळख पटली आहे
 10. सामान्य लोकांमध्ये खूप लवकर पसरतो

संपादन : महादेव गवळी

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply