Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून संतप्त नागरिकांनी पेटवून दिली पोलीस चौकीच..!

दिल्ली :

Advertisement

हेडिंग वाचून ही घटना काश्मीर किंवा नक्षलवादी भागातील असल्याचे आपणास वाटूही शकते. कारण, अशा घटना तिकडे घडतात असाच सगळ्यांचा गैरसमज आहे. मात्र, तसे काहीही नाही ही घटना चक्क उत्तरप्रदेश नावाच्या राज्यातील आहे. आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातीलच आहे. आता या घटनेची संपूर्ण माहिती पाहूया.

Advertisement

यूपी पंचायत स्तरीय निवडणुकीच्या निकालावेळी संतप्त ग्रामस्थांनी गोरखपूर जिल्ह्यातील प्रभाग क्रमांक 60 आणि 61 मधील जिल्हा पंचायत सदस्याच्या पदाच्या निवडणुकीतील गोंधळ यासाठी जबाबदार ठरला आहे. त्यावरून नवीन बाजार पोलिस चौकीला नागरिकांनी पेटवून दिले. आग लावली गेली त्यावेळी चौकीच्या आत पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मात्र, प्रसंगावधान राखून त्यांनी वेळीच पळ काढल्याने ते बचावले.  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गोरखपूर एसएसपी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस दल दाखल झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

NBT Uttar Pradesh on Twitter: “गोरखपुर में जिला पंचायत सदस्य उम्मीदवार के समर्थकों ने फूंकी पुलिस चौकी। झंगहा के नई बाजार की घटना, पेट्रोलपंप में की तोड़फोड़। हारने वाले प्रत्याशी को जीत का प्रमाणपत्र देने का लगा रहे आरोप। #UPPanchayatElections2021 #BreakingNews https://t.co/6ZleNrRvE3” / Twitter

Advertisement

मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 60 मधील जिल्हा पंचायत उमेदवार रवी प्रताप निषाद विजयी झाले पण गोपाळ यादव यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचवेळी प्रभाग क्रमांक 61 मधूनही कोडाई निषाद यांना विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांच्या जागी रमेश यादव यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याच्या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी ही आग लावल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी असेच प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. मात्र, खरे-खोटे हे तपासणी केल्यावरच स्पष्ट होणार आहे. राजकीय नेत्यांसह सामान्य जनतेने अशा घटनांबाबत सोशल मीडियामध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे अशा जागांच्या पदाधिकारी निवडीबाबत निवडणूक आयोग कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply