Take a fresh look at your lifestyle.

‘कॉकटेल’ ट्रीटमेंटला मिळाली मंजुरी; पहा नेमकी कशा पद्धतीने ठरणार रुग्णांना उपकारक

पुणे :

Advertisement

‘कॉकटेल’ शब्द ऐकून अनेकांची उत्सुकता चाळवली गेली असेल. कारण, ‘कॉकटेल’ हा शब्द आपणही अनेकदा ऐकला असेल. ‘कॉकटेल पार्टी’ आणि त्यातील किस्से डोक्यात गर्रागर्रा फिरले असतील. पण, थांबा करोना काळात अशा ‘कॉकटेल’ पार्टीच्या फंदात पडू नका कारण अशा पार्टी आणि कार्यक्रमाने कोविड रुग्णसंख्या कमी नाही तर वाढू शकते.

Advertisement

तर, आता मूळ मुद्द्याकडे येउया. ‘कॉकटेल’ म्हणजे दोन घटकांचे मिश्रण. तर, ‘कॉकटेल’ दारू नाही, तर ही बातमी आहे. ‘एंटीबॉडी कॉकटेल’ची. कोरोनाविरूद्धच्या युद्धात देशाला आणखी एक शस्त्र सापडले आहे. औषधी कंपनी रॉश यांच्या अँटीबॉडी कॉकटेलला कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यासाठी इमर्जन्सी मंजुरी मिळाली आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) भारतात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अँटीबॉडी कॉकटेलला तातडीची मंजुरी दिली असल्याचे रॉश इंडिया यांनी बुधवारी जाहीर केले.

Advertisement

रॉश फार्मा इंडिया या औषधी कंपनीचे एमडी व्ही सिम्पसन इमॅन्युएल म्हणाले की, “भारतातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी उच्च जोखमीच्या रूग्णांची स्थिती खराब होण्यापूर्वी कॅसिरिविमॅब आणि इम्डेविमॅब (casirivimab & imdevimab) सारख्या अँटीबॉडी कॉकटेल कोरोनाविरूद्ध उपचारात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. कोविड 19 चे हे ओपीडी उपचार लसीकरण मोहिमेस पूरक ठरतील आणि भारतातील साथीच्या रोगाविरूद्धच्या आपला लढा नक्कीच यशस्वी करतील.”

Advertisement

रॉश इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेत सादर केलेल्या आकडेवारीवर आणि मानवी आरोग्यावरील वैद्यकीय उत्पादनांच्या वापरावरील युरोपियन युनियनच्या समितीच्या शास्त्रज्ञांच्या मताच्या आधारे भारतात कॅसिरिविमॅब आणि इम्डेविमॅब प्रतिपिंडे यांचे मिश्रण वापरण्यास परवानगी मिळाली आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply