Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगरमधील दोन सहकारी बँकांनी दिली ‘मुख्यमंत्री सहायते’ला मदत

अहमदनगर :

Advertisement

मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अहमदनगर हिळ्यातील दोन सहकारी बँकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मदत केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ‘कोविड-१९’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपुर्द करण्यात आला. तसेच जी.एस. महानगर को-ऑप. बँक लि. अहमदनगरच्यावतीने ‘कोविड-१९ मुख्यमंत्री सहायता निधी’साठी ३५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेशही यावेळी देण्यात आला.

Advertisement

जी.एस. महानगर को-ऑप. बँक लि. अहमदनगरच्यावतीने ‘कोविड-१९ मुख्यमंत्री सहायता निधी’साठी ३५ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपुर्द करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष भास्करराव कवाड, संचालक भाऊसाहेब खंडकर, संचालक सुरेशशेठ ढोमे आदी उपस्थित होते.

Advertisement

तर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ‘कोविड-१९’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपुर्द करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, चंद्रशेखर घुले, राहूल जगताप, प्रशांत गायकवाड, बँकेच मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply