Take a fresh look at your lifestyle.

‘इंडिया लॉकडाऊन’बाबत केंद्र सरकारचे आहे ‘हे’ धोरण; पहा नेमका काय निर्णय होऊ शकतो..

दिल्ली :

Advertisement

देशभरात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आणि हजारो रुग्णांच्या मृत्यूमुळे केंद्र सरकार गेल्या वर्षीप्रमाणे देशभरात लॉकडाउन लादू शकते, अशीही चर्चा होताना दिसत आहे. त्यावर नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी करोना संसर्गाची शृंखला खंडित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना निर्बंधाबाबत निर्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भविष्यात आणखी काही करणे आवश्यक असल्यास त्यावर नेहमीच चर्चा असते असेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

व्ही के पॉल म्हणाले की, जर संसर्ग खूप वाढला तर साखळी तोडण्यासाठी कठोर बंदी घालण्यात येते. अशावेळी सर्वकाही ठप्प असते. या संदर्भात 29 एप्रिल रोजी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.  ज्या ठिकाणी संसर्ग दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे तेथे राज्य सरकारला नाईट कर्फ्यू लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारच यावर निर्णय घेतील. याव्यतिरिक्त, सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हाऊस, रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ आदि बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

ANI on Twitter: “#WATCH | Dr VK Paul, NITI Aayog, when asked if nationwide lockdown the only solution to rise in cases, says, “…If anything more is required those options are always being discussed. There’s already a guideline to states to impose restrictions to suppress chain of transmission.” https://t.co/VBiSXWyTE7″ / Twitter

Advertisement

ते म्हणाले की, याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्यानुसार निर्णय घ्यावा असेही स्पष्टपणे सांगितले आहे. आरोग्य सल्लागाराच्या आधारे राज्य सरकार याबाबत निर्णय घेत आहेत. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक्त इतर काही आवश्यक असल्यास त्या पर्यायांचा विचार केला जाईल. संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारांना निर्बंध लादण्यासाठी मार्गदर्शक सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय लॉकडाऊनचा सध्यातरी विचार नसल्याकडे त्यांनी निर्देश केलाला आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply