Take a fresh look at your lifestyle.

भारतातल्या करोनाकहरासाठी ‘हे’ आहेत जबाबदार; पहा नेमके काय म्हटलेय ‘नेचर’ संशोधन पत्रिकेत

मुंबई :

Advertisement

कोरोना विषाणूचा नवीन आणि प्राणघातक स्ट्रेन भारत आणि ब्राझील फोफावला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 4 लाख तर, भारतात 2 लाखाहून अधिक रुग्णांचा यामुळे मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल नेचरने आपल्या संपादकीयमध्ये याला जबाबदार असलेल्या घटकांना लक्ष्य केले आहे. दोन्ही देशांमधील सरकारने शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत. या लेखात कोरोन संकटाची जबाबदारी दोन्ही देशांमधील राजकीय अपयश असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

भारत आणि ब्राझीलमधील नेते एकतर अपयशी ठरले आहेत किंवा त्यांनी संशोधकांच्या सल्ल्यानुसार कृती करण्यास दुर्लक्ष केले आहे असे ‘नेचर’ने लिहिले आहे. यामुळे लाखो लोकांचे थेट नुकसान झाले आहे. या मासिकाने ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोल्सनारो यांनादेखील लक्ष्य केले. बोल्सोनारो यानी कोरोना विषाणूचे लहान ताप म्हणून वर्णन केले. मास्क घालणे आणि सामाजिक अंतर ठेवणे यासारख्या शास्त्रज्ञांचा सल्ला त्यांनी स्वीकारण्यास नकारही दिला होता.

Advertisement

तर, भारताबाबत म्हटले आहे की, भारतातील नेत्यांनी आवश्यकतेनुसार निर्णायक कृती केली नाही. उदाहरणार्थ, कोरोना विषाणूचा संसर्ग असूनही त्यांनी लोकांना गर्दी करू दिली. काही प्रकरणांमध्ये (निवडणूक व कुंभमेळा, जत्रा, यात्रा, आणि उरूस) नेत्यांनी त्यास प्रोत्साहितदेखील केले. भारतातील निवडणूक प्रचार सभांची गर्दी यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याकडे सूचित केले आहे.

Advertisement

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठ्या निवडणूक सभा घेऊन गर्दी जमवली. याचा परिणाम संपूर्ण जगाने पाहिला आहे. कित्येक महिन्यांपासून अमेरिका कोरोना विषाणूविरोधात लढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 570,000 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली. जी अद्याप जगात सर्वाधिक आहे. त्याचवेळी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात दररोज कोरोना प्रकरणांची संख्या 96000 वर पोहोचली होती. तर, या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा ही संख्या दिवसला 12000 पर्यंत कमी झाली, तेव्हा भारतातील नेते आनंद साजरा करून क्रेडीट घेण्यात गुंग झाले. त्यावेळीही कृषी कायद्यांविरोधात आंदोलन चालू होते. दरम्यान, कुंभमेळा आणि निवडणुका रॅली झाल्या आणि परिस्थिती हाताबाहेर गेली.

Advertisement

मासिकाने लिहिले आहे की, भारतात वैज्ञानिकांना कोरोना विषाणूच्या संशोधनासाठी माहिती मिळणेही अवघड आहे. त्यामुळे संशोधक सरकारला पुराव्यावर आधारित सल्ला देण्यास सक्षम नाहीत. तसेच अचूक अंदाज बांधूही शकत नाहीत. तरीही आकडेवारीचा अभाव असूनही शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनावरील निर्बंध शिथिल न करण्याचा सरकारला इशारा दिला. त्याकडेही पुढे लक्ष दिले नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply