Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसने उपस्थित केले महत्वाचे मुद्दे; पहा भाजपला कसे केलेय लक्ष्य

पुणे :

Advertisement

मराठा आरक्षण रद्द झाल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पद्धतीने यावर आपापली भूमिका मांडली आहे. मात्र, एकानेही याची जबाबदारी घेतलेली नाही. आपण दिलेले आरक्षण टिकवून ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचे भाजपने म्हटलेले आहे. तर, न्यायालयातील निकालाचा दाखला देऊन आरक्षण रद्द होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी केली आहे.

Advertisement

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, गायकवाड आयोग कोणी नेमला?-फडणवीस कायदा कोणी केला?-फडणवीस उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील कोणी नेमले? – फडणवीस १०२ वी घटनादुरुस्ती कोणी केली? मोदीजी राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार कोणी संपुष्टात आणले? मोदीजी मोदी,फडणवीसांचे #मराठाआरक्षण रद्द होण्याचे पाप मविआ सरकारच्या माथी कसे?

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “गायकवाड आयोग कोणी नेमला?-फडणवीस कायदा कोणी केला?-फडणवीस उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील कोणी नेमले? – फडणवीस १०२ वी घटनादुरुस्ती कोणी केली? मोदीजी राज्यांचे आरक्षण देण्याचे अधिकार कोणी संपुष्टात आणले? मोदीजी मोदी,फडणवीसांचे #मराठाआरक्षण रद्द होण्याचे पाप मविआ सरकारच्या माथी कसे?” / Twitter

Advertisement

तसेच सावंत यांनी पुढे म्हतेल आहे की, आता मोदी सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांचे अधिकार संपुष्टात येत नाही हे संसदेला सांगितले पण सर्वोच्च न्यायालयात टाळाटाळ का केली? इच्छा नव्हती का? आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे. आरक्षणाची शिफारस राज्य सरकार करेल. कमिशन नेमून राष्ट्रपतींकडून मोदींनी शिक्कामोर्तब करावे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply