Take a fresh look at your lifestyle.

म्हणून गडकरी फॉर्म्युला आलाय ट्रेंडमध्ये; पहा का मिळत्येय ‘रोड बिल्डर’ना पसंती

मुंबई :

Advertisement

देशभरात करोना कहर जोरात चालू असतानाच केंद्रींय आरोग्य मंत्रालय फ़क़्त आकडेवारी देण्यापुरते उरल्याचे नकारात्मक चित्र आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघेही दिग्गज नेते इलेक्शन मॅनेजमेंटच्या पल्याड विचार करीत नसल्याचे मत बनलेले आहे. अशावेळी करोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी मोदी मंत्रिमंडळातील एकमेव स्वायत्त आणि सक्षम मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे ‘मिशन कोविड’ची जबाबदारी देण्याची मागणी सुरू झालेली आहे.

Advertisement

Subramanian Swamy on Twitter: “India will survive Coronavirus Pandemic as it did Islamic invaders and British Imperialists. We could face one more wave that targets children unless strict precautions now are taken. Modi should therefore delegate the conduct of this war to Gadkari. Relying on PMO is useless” / Twitter

Advertisement

भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी हा मुद्दा ट्रेंडमध्ये आणला आहे. सध्या पंतप्रधान कार्यालायापेक्षा गडकरी हे अशी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पडून देशाला या करोना संकटातून बाहेर काढतील असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वामी यांच्या भावनेला पाठींबा म्हणून गडकरी हे ट्रेंडमध्ये आलेले आहेत. 1995 पासून महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात काम करताना ‘रोड बिल्डर’ म्हणून गडकरी यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. नंतर दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

Advertisement

स्वामी यांनी ट्वीट केले आहे की, “इस्लामिक आक्रमक आणि ब्रिटिश उपनगरीय देशांप्रमाणेच कोरोना विषाणूच्या साथीवरही भारत मात करणार आहे. मात्र, जर आपण आता कठोर खबरदारी घेतली नाही तर आणखी एक लाट येऊ शकेल. ज्याचा परिणाम मुलांवर होईल. त्यामुळे मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांनी गडकरींना या लढ्याचे सेनापती करायला पाहिजे. आत पीएमओवर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे.” स्वामींना गडकरींवर इतका विश्वास का आहे, असा प्रश्न ट्विटरच्या एका वापरकर्त्यानेही विचारला. त्यास उत्तर म्हणून स्वामी म्हणाले, “कारण कोविड विषाणूवर काम करण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. ज्यात गडकरींनी आपली क्षमता वेळोवेळी दाखवून दिली आहे.”

Advertisement

एकूणच यानिमित्ताने मोदी सरकारच्या आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उभे केले गेले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना अशावेळी रिप्लेस करून गडकरी यांना जबाबदारी देणे म्हणजेच आपल्या कार्यक्षमतेवरचा मुद्दा मान्य करण्यासारखे आहे. मोदी आणि शाह यांना असे कोणतेही घटक मान्य नसतात. एकदा निर्णय घेतला की तो इतरांना चूक वाटो किंवा बरोबर वाटो त्यालाच चिकटून राहून गाडा हाकण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून आपली कार्यपद्धती चूक असल्याचे मान्य करून गडकरींना संधी दिली जाणार किंवा नाही याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply