Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण रद्द : पहा मिळालेल्या नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांचे नेमके काय होणार..

पुणे :

Advertisement

2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणामध्ये दिलेले 16 % आरक्षण अखेर आज रद्द झालेले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल देताना 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण हे अवैध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मराठा हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आली आहे.

Advertisement

दरम्यान, यापूर्वीच अनेकांना या आरक्षणाद्वारे नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तसेच अनेकांना शैक्षणिक प्रवेश मिळाले आहेत. त्यांच्याबाबतही न्यायालयाने निकालात भाष्य केले आहे. शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणाऱ्या एसईबीसी कायद्याच्या वैधतेला अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यांनी आव्हान दिल्यावर राज्य शासन आणि औरंगाबादचे विनोद नारायण पाटील हे या सुनावणीत प्रतिवादी होते. पाचसदस्यीय घटनापीठासमोर याची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात 102 वी घटनादुरुस्ती आणि 50टक्के मर्यादा या दोन्ही प्रमुख मुद्द्यांवर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खासगी याचिकाकर्त्यांकडून प्रभावी युक्तिवाद झाला. त्यानुसार सुनावणी झालिया नी अखेर आरक्षण रद्द झालेले आहे.

Advertisement

दरम्यान, न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे की, ‘इंदिरा साहनी प्रकरणातील निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज नाही. महाराष्ट्रात अशी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नव्हती की मराठा आरक्षण आवश्यक होते. तसेच आतापर्यंत मराठा आरक्षणावरून मिळालेल्या नोकऱ्या व प्रवेश कायम राहतील, परंतु यापुढे आरक्षण दिले जाणार नाही.’ एकूणच यापूर्वी आरक्षणाचा लाभ झालेल्यांचे शिक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्या शाबित राहण्याचा मार्गही यानिमित्ताने खुला झाला आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply