Take a fresh look at your lifestyle.

म्हणून मराठा आरक्षण झाले रद्द; पहा भाजपनेही काय दिलीय प्रतिक्रिया

मुंबई :

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा दिल्याने राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाला आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यावर महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवून टीकेची झोड उठवली आहे.

Advertisement

ANI on Twitter: “Supreme Court’s five-judge Constitution bench starts pronouncing its judgment on petitions challenging the constitutional validity of a Maharashtra law that grants reservation to the Maratha community in education and jobs https://t.co/aIh3GGcljc” / Twitter

Advertisement

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणाऱ्या एसईबीसी कायद्याच्या वैधतेला अॅड. जयश्री पाटील-सदावर्ते यांनी आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल दिल्याने आरक्षणाचा मार्ग आता सध्यातरी बंद झाला आहे. मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याची दुरुस्ती संपुष्टात आली असून 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण हे अवैध असल्याचे न्यायालयाने म्हटलेले आहे.

Advertisement

त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, मराठाआरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही.फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली.धिक्कार असो या नाकर्त्यांचा. ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “मराठाआरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही.फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली.धिक्कार असो या नाकर्त्यांचा.” / Twitter

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply