Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून ‘दिव्य मराठी’ने झाकले भाजपच्या दरेकर-कर्डिलेंचे चेहरे; पहा काय आहे कारण

अहमदनगर :

Advertisement

आताच्या करोना काळातही काही महान राजकीय नेते आणि पदाधिकारी मास्क न लावता आणि बेजबाबदार पद्धतीने फिरून बातम्यात येण्यासाठी आटापिटा करीत आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही निवडणूक प्रचारात फोटोमध्ये बेस्ट दिसण्यासाठी मास्क न लावल्याचे आढळले आहे. तोच ट्रेंड नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वीकारला आहे. त्यालाच टोला म्हणून दिव्य मराठी या दैनिकाने थेट भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चेहरे झाकले आहेत.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्याकालयात करोना आढावा बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. त्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार बबनराव पाचपुते, पोलिस अधीक्षक मनोज पाटील,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापौर बाबासाहेब वाकळे, महेंद्र गंधे, प्रसाद ढोकरीकर,अॅड. अभय आगरकर,मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा या सर्वांनी मास्क लावले होते. मात्र, त्याचवेळी दरेकर आणि कर्डिले यांनी मास्क लावणे टाळले होते.

Advertisement
यानिमित्ताने मास्कचे महत्व सांगण्याचा प्रयत्न म्हणून दिव्य मराठीच्या अहमदनगर आवृत्तीमध्ये सगळ्यांचा एकत्रित फोटो प्रसिद्ध करताना या दोन्ही नेत्यांचे फोटो पांढऱ्या रंगाने रंगवून मग प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. “प्रवीण दरेकर-शिवाजी कर्डिले, खुर्ची-पद मिळाल्याने कोणी ‘जबाबदार’ होत नाही! तुम्ही मास्क काढला. आम्ही हे बेजबाबदार चेहरेच फोटोतून काढतोय… ” असेच फोटो कॅप्शन देण्यात आलेले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply