Take a fresh look at your lifestyle.

आय्यो आक्रीत हे घडले की.. महिलेने एकाचवेळी दिला 9 बाळांना जन्म; पहा कुठे घडली ही आश्चर्यकारक घटना

जगभरात अनेक घटना अशा घडतात ज्यांचा कल्पनेच्या पलीकडे असाच उल्लेख करावा लागतो. आणि त्यातही अनेकदा सिद्ध झालेले आहे की, वास्तव हे कल्पनेपेक्षा खूप मोठे, दिव्य आणि भयंकर असू शकते. तसाच प्रकार आता माली देशातील एका महिलेच्या बाबतीत घडला आहे. या महिलेने एकाचवेळी तब्बल 9 बाळांना जन्म दिला आहे.

Advertisement

जगातील ही दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना आफ्रिका खंडातील देश माली येथील महिलेबाबतची असून या महिलेने मोरोक्कोमध्ये 9 मुलांना जन्म दिला आहे.माली देशाच्या सरकारने एक निवेदन जारी केले आहे की, माता आणि मुले सर्व निरोगी आहेत. मात्र, मोरक्को प्रशासनाने अद्याप या घटनेबाबत अधिकृतरीत्या काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माली सरकारने 25 वर्षीय हलिमा सीसाला यांना 30 मार्च रोजी मोरोक्को येथे चांगल्या आरोग्यदायी सुविधा आणि काळजीपोटी पाठवले होते.

Advertisement

सुरुवातीला डॉक्टरांना विश्वास होता की महिलेच्या पोटात 7 मुले आहेत. मात्र, अखेरीस तिने 9 मुलांना जन्म दिला आहे. यापूर्वी एखाद्या महिलेने एकावेळी 6 मुलांचा यशस्वी पद्धतीने जन्म दिल्याचे उदाहर होते. परंतु आता या महिलेने 9 मुलांना जन्म दिला आहे. दरम्यान, मोरोक्कीचे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता राचिड कोउधारी यांनी म्हटले आहे की, देशातील रुग्णालयात इतक्या मुलांना जन्म देण्याच्या घटनेची माहिती त्यांच्याकडे नाही.

Advertisement

मालीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, हलिमाने सीझेरियन पद्धतीने 5 मुली आणि 4 मुलांना जन्म दिला आहे. देशाची आरोग्यमंत्री फंता सिबी यांनी सांगितले आहे की, ‘माता व मुले अजूनही निरोगी आहेत.’ ते म्हणाले की, या महिलेबरोबर माली येथील डॉक्टरही आले आहेत आणि ते क्षणोक्षणी याची माहिती देत ​​आहेत. पुढच्या काही आठवड्यांनंतर हलीमा आणि तिच्या मुलांना परत आणले जाईल. दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी हलिमाच्या प्रकृतीविषयी आणि मुलांच्या जीवनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मालीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, सुरुवातीच्या अल्ट्रासाऊंडमध्ये हलिमाच्या पोटात 7 मुले असल्याचे आढळले. मात्र, तिने एकूण 9 मुलांना जन्म दिला आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल सिबी यांनी माली आणि मोरोक्कोच्या आरोग्य विभागाचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply