Take a fresh look at your lifestyle.

कोरोना लसीचा दुसरा डोस मिळालाच नाही तर.. वाचा तुम्ही किती सुरक्षित असाल..?

मुंबई : देशभर कोरोनाचा कहर सुरु आहे. दुसरीकडे कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मेपासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पहिली लस घेतलेल्या नागरिकांनाच अजून लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. दुसऱ्या डोसला उशीर झाला तर…? किंवा मिळालाच नाही तर…? पहिल्या डोसमुळे आपण किती सुरक्षित आहोत..? असे प्रश्न तुमच्या मनातही घोळत असतील, तर ही बातमी वाचा की..!

Advertisement

लशीच्या दुसऱ्या डोसला ‘बूस्टर डोस’ असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या डोसला पूरक आणि वर त्याची ताकद वाढवणारा डोस. पहिला डोस कोरोनाचा धोका निम्मा कमी करतो, असं एक संशोधन सांगतं.

Advertisement

युकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड लस आणि फायझर लशीवर हे संशोधन केलं. आणि त्यातले निष्कर्ष असं सांगतात..

Advertisement
  • लस घेतल्यानंतर 3 आठवड्यांत व्यक्तीकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी होते.
  • लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी त्या व्यक्तीला कोरोनापासून संरक्षण मिळत.
  • लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता 4 आठवड्यांनंतर 60 ते 65 टक्क्यांनी कमी.
  • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही केसेसमध्ये लोकांना मधल्या काळात कोव्हिड झाला, तरी घाबरण्याचं कारण नाही. एकतर अशा रुग्णांची लक्षणं सौम्य होती. तसेच त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे.

नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. राहुल तांबे सांगतात, “लशीचा पहिला डोस रोगाविषयीची प्रतिकारकशक्ती शरीरात जागवण्याचं काम करतो. त्यामुळे शरीरात अँटि बॉडीज् (anti bodij) तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण, दुसरा डोस ही प्रक्रिया अधिक वेगवान करतो. त्यामुळे अँटीबॉडीज आणि प्रतिकार शक्ती काम करण्याचं प्रमाण वाढतं. तेव्हा पहिला डोस संसर्गाचा धोका कमी करत असला तरी दुसरा डोसही आवश्यक आहे.”

Advertisement

साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. पण, आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय..? याबाबत डॉ. तात्याराव लहाने यांच्या मते, “कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत घेतला, तरी चालतो. कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल.”

Advertisement

समजा दुसरा डोस मिळालाच नाही तर..
डॉ. तात्याराव लहाने यांच्या मते, “पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे फारसं घाबरण्याचं कारण नाही.” तर डॉ. राहुल तांबे म्हणतात, “पहिल्या डोसमुळे मिळणारं संरक्षण हे कमी आहे. पहिला डोस झाल्यानंतरही तुम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका राहतो. संपूर्ण संरक्षणासाठी दुसरा डोस आवश्यक आहे. दुसऱ्या डोसनंतर कोरोना झाला तरी त्यातला संसर्ग कमी असतो, लक्षणं सौम्य असतात.”

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply