Take a fresh look at your lifestyle.

घ्या आता, ‘सीरम’ निघालंय लंडनला..! तेथे करणार लसउत्पादन, पहा कितीची गुंतवणूक करणार?

नवी दिल्ली : काही राजकारणी व उद्योजकांकडून दिल्या गेलेल्या धमक्यांमुळे भारत सोडून लंडनला गेलेल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी भारताबाहेर लसउत्पादन वाढवण्याचे संकेत अलीकडेच दिले होते. त्यानुसार आपल्या लसीचा व्यवसाय वाढवण्यासाठी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने इंग्लंडमध्ये 24 कोटी पाऊंडस्‌ची, अर्थात 24 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत इंग्लंडमधील व्यापारवृध्दी अंतर्गत ही गुंतवणूक करणार असून, त्यामुळे इंग्लंडमध्ये साडेसहा हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात होणाऱ्या चर्चेआधी ही घोषणा करण्यात आली. हेल्थकेअर, बायोटेक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील 20 भारतीय कंपन्यांनी या आठवड्यात इंग्लंडमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. त्यात ‘सीरम’चाही समावेश आहे.

Advertisement

इंग्लंडमध्ये नव्याने सुरू केलेल्या विक्री कार्यालयाद्वारे एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा नवा व्यवसाय ‘सीरम’ला मिळेल. त्याची गुंतवणूकही इंग्लंडमध्येच करण्यात येईल, असे निवेदन पंतप्रधान कार्यालयाने कंपनीच्या इंग्लंडमधील बाजारपेठेच्या संदर्भातील योजनेच्या अनुषंगाने केले आहे.

Advertisement

‘सीरम’च्या लंडनमधील गुंतवणुकीने मानवी चाचण्या, संशोधन आणि विकास, तसेच लसउत्पादनाला गती मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी त्याचा फायदा इंग्लंडसह साऱ्या जगाला होणार आहे. ‘कोडॅजेनिक्‍स’च्या सहकार्याने नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीच्या मानवी चाचणीस ‘सीरम’ने इंग्लंडमध्ये सुरवात केली आहे.

Advertisement

सध्या लंडनमध्ये असणाऱ्या पूनावाला यांनी लंडनमध्ये झालेल्या चर्चेचे वर्णन ‘उत्तम’ असे केले होते. आम्ही आणखी कठोर परिश्रम करू आणि भारताचा कोरोनाविरूध्दचा लढा मजबूत करू, असे ट्‌विटही पुनावाला यांनी केले आहे.

Advertisement

‘ग्लोबल जेन कॉर्प’ यांनी येत्या पाच वर्षात 5 कोटी 90 लाख पाउंडची गुंतवणूक इंग्लंडमध्ये करण्यास अनुकुलता दर्शवली आहे. त्यांचा तेथे संशोधन आणि विकास विभाग विकसित करणार असून, ‘केंब्रीज’च्या जनुकीय संरचना विभागात तो उभारण्यात येणार आहे.

Advertisement

भारतातील प्रख्यात कंपन्या इंग्लंडमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यासोबत ‘ग्लोबल जेन कॉर्प’ने हातात हात मिळवल्याने मला आनंद होत आहे. त्यामुळे आमच्या आरोग्य क्षेत्राला चालना मिळून आर्थिक वाढीला हातभार लागेल, असे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

Advertisement

Leave a Reply