Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : अखेर स्पर्धा स्थगित; ‘त्या’ जागतिक स्पर्धेबाबतही धोक्याची घंटा..!

मुंबई :

Advertisement

आयपीएलचे यंदाचे सीझन रद्द करावे अशी मागणी होत असतानाच खेळाडू आणि मैदानावरील क्र्यूमध्ये अनेकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर हा निर्णय झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएलचे पूर्ण सीझन स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

Advertisement

फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानातील PSL मध्ये 6 खेळाडूंसह 8 जण कोरोना संक्रमित झाल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा तातडीने गुंडाळली होती. आता आयपीएलमध्ये 7 क्रिकेटर्सला कोरोना झाल्यानंतरही भारतीय क्रिकेट बोर्ड कशाची वाट पाहत आहे, यावरुन टीकेची झोड उठली होती. पूर्णपणे रद्द झाल्यास बीसीसीआयला तब्बल 2000 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सोबतच, यावर्षी भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर देखील आता धोक्याची घंटा आहे. 

Advertisement

कोरोना रुग्णांमुळे भारताकडून आयोजनाचा मान परत घेतला जाऊ शकतो. त्यात सुद्धा वेगळा हजारो कोटींचा फटका बीसीसीआयला बसू शकतो. चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीसह दोन स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, नीतीश राणा, अक्षर पटेल,  डेनियल सैम्स, एनरिक नॉर्खिया आणि देवदत्त पडिक्कल हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply